वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील या अभियानाचा शुभारंभ बुधवारी (दि.१४) कानेगाव गणातील हिप्परगा रवा या गावातून करण्यात आला. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसैनिक हे सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात नेहमीच धावून जातात. परंतु सध्याच्या संकटकाळात मुख्यमंत्र्यांचे कार्य व शासनाच्या विविध योजना नागरिकापर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आल्याचे सांगितले. या कार्यक्रमास युवा नेते किरण गायकवाड, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उमरग्याचे माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, श्याम नारायणकर, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, सलीम शेख, अविनाश माळी, दीपक रोडगे, श्रीकांत भरारे, प्रताप घोडके, योगेश जाधव, धर्मवीर जाधव, भरत सुतार, इंद्रजित लोमटे, हिप्परगा रवा गावचे सरपंच राम मोरे, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, कास्तीचे सरपंच परवेज तांबोळी, मोघाचे सरपंच सचिन गोरे, महेबूब गवंडी, दत्ता मोरे, शुभम जावळे, नितीन जाधव, अनिल मोरे, प्रेम लांडगे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.