Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात यावेत – खासदार ओमराजे निंबाळकर यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र – पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी यांनी कृषी व महसूल विभागाला दिले आदेश

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ,जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या पत्राची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह सर्व तहसीलदार यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे सोमवारी (दि. १२) आदेश दिले आहेत.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणले आहे की, दि. ९ जुलै रोजी तुळजापूर तालुक्यातील सलगरा, इटकळ, जळकोट, मंगरुळ, परंडा तालुक्यातील आस, जवळा, आनाळा, सोनारी, उमरगा तालुक्यातील उमरगा, दाळिंब, गुळज, तसेच लोहारा तालुक्यातील लोहारा, माकणी, उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे मी स्वतः दि.१० जुलै रोजी मेंढा, लासोना, सांगवी, बोरखेडा, कनगरा, बोरगाव (राजे), घुगी, पाडोळी, कामेगाव तसेच समुद्रवाणी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे ओढा नाल्यांना पूर आला होता. या पुरामध्ये लासोना येथील बबन भगवान रसाळ (वय ४२) व कनगरा येथील समीर गुनुस शेख (वय २७) हे दोघेजण वाहून गेले होते. त्यापैकी समीर मुनुस शेख यांचा मृतदेह सापडला आहे. परंतु राहीलेल्या एकाचा शोध सुरु असून अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे शोध मोहीमेचे कार्य युध्द पातळीवर सुरु करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी गावात शिरल्याने घरांची पडझड झाली व नुकतीच पेरणी केलेली पिके, जमिनी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्या आहेत तसेच रस्त्यावरील जुने पुल व बंधारे वाहून गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे, पिक नुकसानीचे, घरांच्या पडझडीचे तसेच जिवीत हानीचे पंचनामे तात्काळ करणे, वाहून गेलेले पुल व बंधारे याची देखील दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच मयत समीर युनुस शेख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच उपरोक्त गावातील तसेच जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे या पत्राद्वारे केली होती. \"\"त्यांच्या या पत्राची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह सर्व तहसीलदार यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे सोमवारी (दि. १२) आदेश दिले आहेत.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: खासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

लोहारा तालुक्यातील 31 टक्के नागरिकांनी घेतली लस

Next Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवसंपर्क अभियानाचे उद्घाटन – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, युवा नेते किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवसंपर्क अभियानाचे उद्घाटन - खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, युवा नेते किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!