Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते प्रा. डॉ. महेश मोटे व प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांचा सत्कार

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रा. डॉ. महेश मोटे यांना अमेरिकेतील ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने डी. लीट पदवी मिळाल्याबद्दल व लातूरचे प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते रविवारी (दि. १) उमरगा येथे सत्कार करण्यात आला.\"\" प्रा. डॉ. मोटे हे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा प्रतिनिधी तथा महाराष्ट्र पत्रकार संघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष म्हणूनही गेल्या अनेक वर्षापासून कार्य करीत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी, अमेरिका यांच्याकडून मानद डॉक्टरेट ऑफ लिटरेचर पदवी प्रदान करण्यात आली. तसेच प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड हे विविध सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, मराठवाडा जनता विकास परिषद, वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, उपेक्षितांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आहे. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे विद्यमान सदस्य असून लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल आमदार चौगुले यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. यावेळी रोटरीचे माजी सचिव प्रा. युसुफ मुल्ला, नगरसेवक पंढरीनाथ कोने, शरद पवार, प्रभाकर गायकवाड, सुरेश झाकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Tags: आमदार ज्ञानराज चौगुले
Previous Post

उपेक्षितांना कथा-कादंबरीचे नायक बनविणारे महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे – प्रा. किरण सगर

Next Post

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम – मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार – उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट – नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम - मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार - उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट - नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!