Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास मान्यता – 15 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

by admin
in ब्रेकिंग, महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. ८) रात्री ८ वाजता राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.  आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे.  केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे.

मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.

सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यूआर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केले आहे.

Tags: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई लोकल
Previous Post

उमरगा तालुक्यातील मुरूम येथे राष्ट्रवादी चषक क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन – उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार व लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन

Next Post

मंगळवारी (१० ऑगस्ट ) १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा डोस – २८ दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

मंगळवारी (१० ऑगस्ट ) १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा डोस - २८ दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!