Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

मुरूम येथील किसान चौक नागरी समितीच्या वतीने पोलिस उपअधिक्षक राजेंद्र पाटील, डॉ. रविंद्र गायकवाड यांचा सत्कार

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील किसान चौक नागरी समिती, मराठा सेवा संघ, किसान ब्रिगेड, मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १६) भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे होते. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, भारत शिक्षण संस्थेचे संचालक तानाजीभाऊ फुगटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक माळी, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, सचिव शरणाप्पा मुदकण्णा, नगरसेवक अजित चौधरी, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, आत्माराम वाघ, बाबुराव जाधव गुरुजी, माजी सैनिक व्यंकट चौधरी, प्रगतशील शेतकरी देवानंद बिराजदार, माजी नगरसेवक अशोक जाधव, युवासेना शहर प्रमुख भगत माळी, व्यापारी ज्ञानेश्वर चौधरी, विकास फुगटे, सुरेश मंगरूळे, श्रीधर इंगळे, राघू शिंदे, बाळू खंडागळे, अर्जुन खंडागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\"\"यावेळी मुंबईचे सेवानिवृत्त पोलिस उपआधीक्षक राजेंद्र नरसिंगराव पाटील यांचा प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती बद्दल त्यांचा नागरी समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. नुकताच रोटरी क्लबच्या वतीने रोटरी नेशन बिल्डर अवार्ड पुरस्काराने गौरविण्यात आलेले श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. रविंद्र दादाराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना राजेंद्र पाटील म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल काळामध्ये बी.एस्सी. पदवी प्राप्त झाल्यानंतर स्पर्धा परीक्षाकडे वळलो. वडील शिक्षक असल्याने वैचारिक ग्रंथसंपदा मला लहानपणापासून वाचायला मिळाली. या सोबतच स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. त्यामुळेच मला यश संपादन करता आले. पोलिस प्रशासनामध्ये सेवा करत असताना प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य केल्यामुळेच मुरुमची एक वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण करता आली. अध्यक्षीय समारोप प्रसंगी दत्तात्रय इंगळे म्हणाले की, अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असून विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी अंबाबाई मंदिर समिती व किसान शिवजन्मोत्सव जयंती उत्सव समितीच्या वतीनेही उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नितीन डागा, अशोक माळी, लखन भोंडवे, बबलू अंबर आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव यांनी केले.

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा येथील जगदंबा मंदिर ट्रस्ट आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

Next Post

डॉ. शिला स्वामी-हिरेमठ यांना नारीशक्ती सन्मान पुरस्कार

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

डॉ. शिला स्वामी-हिरेमठ यांना नारीशक्ती सन्मान पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!