वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यातील २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडत कार्यक्रम कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आरक्षण सोडतीचा हा कार्यक्रम दि. १३ जुलै ला होणार होता. परंतु हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने दि. १२ जुलै रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे.
दि.१२ जुलै च्या राज्य निवडणूक आयोगाच्या या पत्रात म्हणले आहे की, राज्य निवडणूक आयोगाचे दि. ५ जुलै च्या पत्रान्वये
राज्यातील २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडत कार्यक्रम देण्यात आला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ मध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर आज दि.१२ जुलै रोजी सुनावणी झाली असून एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या अनुषंगाने आपणास कळविण्यात येत आहे की, आयोगाचे दि. ५/७/२०२२ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात येत आहे. यासंदर्भात सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. या पत्रावर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांची स्वाक्षरी आहे.