Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेदवारांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 14 ऑक्टोंबर रोजी आयोजन – नामांकित कंपन्याचे अधिकारी 1025 पदासांठी निवड करणार

admin by admin
12/10/2022
in आपला जिल्हा
A A
0

उस्मानाबाद, दि.11:- शासनाच्या रोजगार व स्वंयरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षीत बेरोजगार, नोकरी इच्छुक उमेदवार यांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उदेशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागा मार्फत “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे” आयोजित करण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यातील आस्थापना, उद्योग यांना आवाहन करून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहभागी करून घेतले आहे. तसेच मुंबई,पुणे,औरंगाबाद,सोलापूर, बारामती येथील नामांकित कंपन्याही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपपरिसर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 ऑक्टोंबर 2022 रोजी “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील नामांकित 16 उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. या माध्यमातून 1025 पदे अधिसूचित केली आहेत. पात्र आणि इच्छुक पुरूष तसेच स्त्री उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रकिया करणार आहेत.
या मेळाव्यात दहावी पास किंवा नापास, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, ग्रज्युऐट, इंजिनिअरिंग यांना या रिलेशनशिप मॅनेजर, सेल्स एक्झीकिटीव, सर्टीफाईड इंटरनेट कन्सलटंट, एमबीए एचआर, फायनन्स, मार्केटींग प्रोफेशनल, टीचर डीएड, बीएड, एमएड, ट्रेनी केंद्र मॅनेजर, सॉफ्टवेअर इजिंनिअर, अकाउटंट, केमिस्ट, ऑपरेटर, जॉब ट्रेनी, सेल्स ट्रेनी,मशीन ऑपरेटर,हेल्पर, आयटीआय सर्व ट्रेड अशा प्रकारचे अनेक संधी रोजगार मेळाव्यातून उपलब्ध हेाणार आहेत.
या मेळाव्यामध्ये मुंबई येथील एनआयआयटी प्रा.लि. (आयसीआयसीआय बँकेकरिता), पेटीएम, जस्टडायल, गुडवर्कर, एक्सलेंट टिचर, उस्मानाबाद येथील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि., ॲडलर्स बायोएनर्जी, डी.आर पॅकर्स, ऑरडर टेक्नॉलॉजी, समृध्दी गारमेंटस किनी, बारामती येथील पियाजिओ व्हेईकल्स, चाकण येथील धुत ट्रॉन्समिशन, औरंगाबाद येथील नवभारत फर्टीलायजर, लक्ष्मी अग्नीकॉम्पो, सवेरा ॲटो कॉम्पो, सोलापूर चिंचाली येथील बालाजी अमाईन्स या कंपन्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
तरी या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त संख्येने नोकरी इच्छुक उमेदवार, पालक, नागरिकांनी शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ठीक 11-00 वाजता उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ उपपरिसर, एमआयडीसी एरिया या ठिकाणी उपस्थित राहून रोजगार मेळाव्यातील रोजगारच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.

Tags: रोजगार
Previous Post

एसबीआय दत्त नगर शाखेच्या वतीने बँक मेळाव्याचे आयोजन – उमेदच्या 23 बचत गटांना 66 लाखाचे कर्ज वितरण

Next Post

तांडा, वस्ती वाडीवरील शाळा बंद करू नका – उमरगा येथील समविचारी संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

तांडा, वस्ती वाडीवरील शाळा बंद करू नका - उमरगा येथील समविचारी संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's