वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी यांच्या तर्फे दाळिंब येथे बुधवारी (दि.२६) दिवाळी पाडवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे आधार वृद्ध भोजन केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष मा.प्रा.सुरेशदाजी बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आधार वृद्ध भोजन केंद्रामधील निराधार लोकांना संपुर्ण आहेर करून फराळीचं वाटप करण्यात आले.
गेली तीन चार वर्षापासून आपल्या सामाजीक कार्याने महाराष्ट्रभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बाबाभाई जाफरी हे त्यांच्या सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या आधारवृद्ध भोजन केंद्रामध्ये प्रतिवर्षी हा कार्यक्रम राबवतात. गावातील व परिसरातील अनेक वृद्ध वडिलधाऱ्या निराधार लोकांना आधार वृद्ध भोजन सेवा केंद्राच्या माध्यमातून कोणत्याही शासकीय अनुदानाविना जवळपास ५० लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली जाते. वर्षभरातील येणाऱ्या मोठ्या सण उत्सवामध्ये या सर्वांना आपल्या आनंदामध्ये सामिल करून घेत त्यांना निराधार असल्याची कधीही जाणीव होऊ न देता बाबा आणि त्यांच्या फाऊंडेशनमधील सहकाऱ्यांनी नेहमीच ही सामाजीक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनासारख्या संकटामध्ये महाराष्ट्रभरातून ज्या सामाजीक संघटनानी महत्वपूर्ण भुमिका बजावली. त्या टॉपच्या मोजक्या संघटनेमध्ये बाबा जाफरी सोशल फाऊंडेशनचं काम हे उल्लेखणीय राहीलेलं आहे. स्वतःचे नातेवाईक परिवारातील रक्ताची नाती कोरोना संकटामध्ये दुरावत असताना बाबा जाफरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे इदगाह कोवीड सेंटर येथे अनेक रुग्णांची काळजी घेत त्यांना सुखरूप घरी पाठवण्याचं काम केलं. एखाद्या गरिब कुटुंबातील व्यक्तीच्या मुलीचं लग्न असेल तर त्या लग्नामधील संसार उपयोगी लागणारे सर्व साहीत्य हे बाबा जाफरी स्वखर्चातून करत असतात. पैशासाठी आर्थिक परिस्थीतीमुळे अनेकांना आपल्या मुलींच्या लग्नाचा खर्च करणे अशक्यप्राय होतं. अशा शेकडो मुलींच कन्यादान बाबा जाफरी यांच्या हातून होताना आम्ही नेहमीच पाहत आलोय. या अशा अडचणीत असणाऱ्या अनेक गरिब कुटुंबातील शेकडो लोकांना बाबा जाफरी यांनी आधार देण्याचा प्रामाणीक प्रयत्न केला आहे.
हे फाउंडेशन आधीक गतिमान करून त्याचा विस्तार करण्याकरिता लोकप्रतिनिधींनी यात जातीने लक्ष घालून बाबा जाफरी यांना आर्थिक आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे अनेक निराधार लोकांना आधार मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे.
बुधवारी (दि.२६) पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी बाबा भाई जाफरी हे करत असलेल्या कार्याचं कौतूक करून गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता आणि फाऊंडेशच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या विविध सामाजीक कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन याप्रसंगी दिले असुन भविष्यात बाबा जाफरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा शब्द याप्रसंगी गावकऱ्यांना दिला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक राम पाटील होते. डॉ. मंमाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बाबा जाफरी यांच्यासह त्यांच्या पत्नी इरफाना जाफरी, मुलगी साजीया जाफरी, सानिया जाफरी, आरमान जाफरी, हासिम जाफरी, दाळींब नगरीच्या सरपंच रंजनाताई बालाजी सातपुते, उपसरपंच असिफ शिलार,माजी सरपंच सोमनाथ कुंभार, माजी उपसरपंच इरफान जहागीरदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, उमरगा – लोहारा कार्याध्यक्ष अमोल पाटील, परमेश्वर शेवरे, शौकत लाडु, साहेबलाल कमाल, नेताजी कवठे, अफसर मुल्ला, सोमशंकर माळी, हर्षवर्धन गुंड, दयानंद माळगे, डॉ. महेबुब मुलानी, डॉ. मुसा मुजावर, डॉ.मुल्ला साहेब, दाळींब नगरीचे युवा उद्योजक परवेज मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य हिराजी गायकवाड, जब्बार पटेल, संजय कुंभार, महंमद शेख, बालाजी सातपुते आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बस्वराज सारणे यांनी तर बाबा जाफरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.