Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आमचे ग्रहण कधी सुटणार ? – ॲड. शीतल शामराव चव्हाण

admin by admin
28/10/2022
in आपला जिल्हा
A A
0

प्रकाशाचा उत्सव समजल्या जाणाऱ्या दीपावली दरम्यान पृथीचा प्रमुख ऊर्जास्त्रोत असलेल्या सुर्याला ग्रहण लागले. ग्रहण काळात आम्हा भारतीयांची जी लगबग असते तो एक स्वतंत्र कादंबरीचा अथवा कथेचा विषय व्हावा एवढ्या मनोरंजक गोष्टी या काळात आपल्याकडे घडत असतात. निसर्गातल्या हलचालींना कल्पनेची आवरणे चढवून भारतीय लोक अनेक प्रथा व कर्मकांडांची निर्मिती करतात. पण मानवी मेंदूला लागलेल्या गैरसमजूतींच्या ग्रहणाबाबत काय? थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी ‘आमचे ग्रहण अजून सुटले नाही’ या मथळ्याखाली लेख लिहून सुर्य, ग्रह अन् ग्रहण याविषयीच्या भारतीयांच्या गैरसमजूतींचा समाचार घेतला होता. सुर्याचे ग्रहण अन् त्याबद्दलच्या गैरसमजूती याबद्दल बरेच प्रबोधन झाले आहे, होत आहे. काही प्रमाणात बदलही झाले आहेत. पण भारतीय लोकशाहीला लागलेल्या ग्रहणाबद्दल आता नुसता गांभीर्याने विचारच नाही, तर प्रत्येक माणसाने सक्रिय होवून काही कृती करण्याची वेळ आलेली आहे.
१९४७ ला आम्ही इंग्रजी सत्तेच्या जोखडातून मुक्त झालो. १९५० पासून लोकशाही स्विकारणारे संविधान लागू झाले. ‘आम्ही भारताच्या लोकांनी’ लोकशाही, समाजवादी अन धर्मनिरपेक्ष समाजाच्या स्थापनेचा संकल्प संविधानाद्वारे केला. एखाद्या गोष्टीचा संकल्प केला म्हणजे ती गोष्ट झाली असे होत नाही. तर ती घडवून आणण्याचा अन् ते घडवून आणण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याचा निर्धार आम्ही केलेला असतो. म्हणूनच संकल्पानंतर संकल्पपूर्तीसाठी आवश्यक ते योगदान आम्हाला द्यावे लागते. आम्ही भारताच्या लोकांनी हा संकल्प केला होता म्हणून अर्थातच या संकल्पपूर्तीसाठी आवश्यक ते योगदान देण्याची सर्वस्वी जबाबदारी आम्हा तमाम भारतीय लोकांची आहे, हे भान आम्ही विसरलो. स्वातंत्र्यानंतर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आधीच्या सरंजामी व्यवस्थेचे संस्कार ठळकपणे जाणवतील अशी व्यवस्था निर्माण झाली. सत्ता, सत्तेमुळे सार्वजनिक श्रमातून निर्माण झालेल्या संपत्तीवरील मिळालेला ताबा, या ताब्यातून गैरमार्गाने कमावलेला पैसा, हा पैसा वापरुन पुन्हा मिळवलेली सत्ता अशा दुष्टचक्रात आमची लोकशाही अडकली. या प्रक्रियेत राजकीय नेते, अधिकारी वर्ग, उद्योगपती गबरगंड झाले. प्रत्येक निवडणूकीत बहुतांश जनता दारु, मटन, पैसा, जात, धर्म, भावनिक मुद्दे, व्यक्तिगत स्वार्थ, नोकऱ्या, गुत्तेदाऱ्या या अमिषाला बळी पडत गेली अन् राज्यकर्त्यांचे मिंदे होवून बसली. विकले न जाणारे, शहाणे असलेले मध्यमवर्गीय लोक आपल्या व्यक्तिगत जीवनात, आपली स्वत:ची प्रगती साधण्यात अन् मौजमजेत व्यस्त राहिले. ‘शहाण्या माणसांनी राजकारणात पडू नये’ अशी सभ्यतेची नवी परिभाषा निर्माण करुन त्यांनी नव्या पिढ्यांनाही राजकीय हस्तक्षेपापासून चार हात दूर राहण्यासाठीचे वातावरण निर्माण केले. परिणामी देशाच्या सर्व क्षेत्रात अनागोंदी माजली. राज्यकर्ते उद्योगपतींचे बटीक होवून सार्वजनिक मालमत्ता त्यांच्या घशात घालू लागले. जनतेकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर वसूल केला जावू लागला पण शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा यावरील करायच्या गुंतवणूकींचा मात्र संकोच करण्यात येवू लागला. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरुन जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी अनेक गैरलागू मुद्द्यांना चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्यात आले. आता तर आरबीआय, सीबीआय, ईडी, न्यायालये या स्वायत्त संस्थांच्या गळ्यात केंद्रीय सत्तेने पट्टे बांधून आपल्या मर्जीप्रमाणे त्यांचा वापर सुरु केला आहे.


भारतीय लोकशाहीला लागलेल्या या ‘अखंड ग्रहणा’ने काळाकुट्ट अंधार पसरलेला असताना आमचे सूर्यग्रहण अप्रूप मात्र अजून सुटलेले नाही. सुर्यग्रहणे होत राहतील, सुटत राहतील. पण आमच्या लोकशाहीला लागलेल्या पैसाकेंद्री राजकारण, घराणेशाही, गुंडगीरी, एकाधिकारशाही व अस्मितेच्या राजकारणाचे लागलेले ग्रहण कधी सुटणार? आमचे ग्रहण कधी सुटणार? हा मूळ प्रश्न आहे. या प्रश्नाच्या खोलाशी जावून लोकांच्या बुद्धी व चेतनेवर चढलेली धूळघाण विवेकाच्या सहाय्याने झटकून टाकत लोकशाहीला लागलेले ग्रहण व या ग्रहणाचे परिणाम हटवल्याशिवाय तरणोपाय नाही.

ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

Tags: ॲड. शीतल शामराव चव्हाण
Previous Post

भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे ७ लाख मे. टन गाळपाचे उद्दीष्ट – चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार – भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा पाचवा गाळप हंगाम शुभारंभ उत्साहात

Next Post

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका – खासदार ओमराजे निंबाळकर यांचा विमा कंपनी व सरकारला ईशारा

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका - खासदार ओमराजे निंबाळकर यांचा विमा कंपनी व सरकारला ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's