वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायत येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र नगरपंचायतीच्या हद्दीतच उभा करून घनकचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोहारा तहसीलदार यांच्या मार्फत गुरुवारी (दि.१) हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा नगरपंचायत येथील ओला व सुका कचरा प्रक्रिया केंद्र नगरपंचायतीच्या हद्दीतच उभारून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी. लोहारा शहरातील कचरा इतर खेडेगावात विल्हेवाटीसाठी नेण्यात आला तर तेथील नागरिकांना विविध रोगराईला बळी पडावे लागेल. असे होऊ नये म्हणून लोहारा शहरातील कचऱ्याची नगरपंचायतीच्या हद्दीतच विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) रोजगार आघाडी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष माननीय उत्तम भालेराव यांच्या वतीने देण्यात आला आहे. लोहारा तहसिल कार्यालयाचे अव्वल कारकून बालाजी चामे यांनी हे निवेदन स्वीकारले.
या निवेदनावर उत्तम भालेराव, बालाजी माटे, तिम्मा माने, ज्ञानेश्वर भालेराव, देविदास घाटे, मोहन वाघमारे यांच्या सह्या आहेत.