Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश

by admin
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
वाशी तालुक्यातील मांडवा येथील युवराज त्रिंबक पाटील वय 45 वर्षे यांचा दि. 11.03.2022 ते दि. 2103.2022 रोजी दरम्यान संशयीत व्यक्तीने अज्ञात कारणासाठी दोरीने गळा आवळून युवराज यांना ठार मारले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून सोनगीरी येथील साठवण तलावातील पाण्यात टाकला होता. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या- दत्तात्रय अरुण पाटील, रा. मांडवा, ता. वाशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत भूम पो.ठा. येथे गुन्हा क्र. 67/2022 हा नोंदवला आहे.
सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी- गणेश अप्पाराव पवार, वय 37 वर्षे, देवधानोरा, ता. कळंब हा पोलीसांना तपासकामी पाहिजे असल्याचे पोलीस त्याच्या मागावर होते. तो आपले वास्त्व्य बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. स्था.गु.शा. च्या पथकाने सदर गुन्हा तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषन व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गणेश पवार हा तडवळा व गोपाळवाडी शिवारातील आपल्या मुलीच्या शेतात वास्तव्यास असल्याचे समजले. यावर मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नमूद ठिकाणी रवाना होउन पथकाने तो रहात असलेल्या तडवळा व गोपाळवाडी शिवारातून गणेश पवार यास दि. 06.12.2022 रोजी अटक करुन पुढील कार्यवाहिस्तव भुम पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. यशवंत जाधव, सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोलीस अंमलदार- प्रकाश औताडे, उलीउल्ला काझी, जावेद काझी, शौकत पठाण, हुसेन सय्यद, पांडुरंग मस्के, वैशाली सोनवणे, अशोक कदम, बलदेव ठाकूर यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

तावशीगड येथील माजी सरपंच मंगेश पाटील यांचे निधन

Next Post

माकणी येथील यात्रा महोत्सवास सुरुवात – हजारो भविकांनी घेतले दर्शन

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

माकणी येथील यात्रा महोत्सवास सुरुवात - हजारो भविकांनी घेतले दर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!