वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. परंतु या निकालाविरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगून या जामीनाला तात्पुरती स्थगिती द्यावी अशी विनंती न्यायालयास केली. त्यानंतर देशमुख यांच्या जामीनाला हायकोर्टाने दहा दिवसांची स्थगिती दिली आहे.
एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे अशी माहिती अनिल देशमुख यांच्या वकिलांनी दिली आहे. अनिल देशमुख यांना आपला पासपोर्ट जो आहे तो जमा करावा लागेल. तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना देशाच्या बाहेर जाण्यास मनाई आहे. आठवड्यातले दोन दिवस त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागेल यासह अन्य काही अटी घालण्यात आल्या आहेत. देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टात काय निर्णय होणार यावरच देशमुखांच्या सुटकेचा मार्ग अवलंबून असणार आहे.