वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालय येथे गुरुवारी (दि.२२) श्रीनिवास रामानुजन यांची जयंती गणित दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका एस. एम. कांबळे या होत्या. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध कवी योगीराज माने, श्री. शेळके सर, कुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रतिमा पूजनानंतर कुमार पाटील यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित असणारे सुप्रसिद्ध कवी योगीराज माने यांनी बाप माझा,आई,मुलीची व नातवाची कविता सादर करून विद्यार्थ्यांना कल्पना जगताची सहल करायला लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन पाटील यांनी केले. सुनील माने यांनी आभार मानले. याच कार्यक्रमामध्ये प्रशालेतील इयत्ता दहावी ब मधील विद्यार्थिनी अंकिता बाबळसुरे हिने आपली स्वरचित कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. योगीराज माने सरांनी सदरील विद्यार्थिनीला शंभर रुपयाचे रोख पारितोषिक देऊन तिला प्रोत्साहित केले.