वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – लोहारा – सुमित झिंगाडे
लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथे मंगळवारी (दि.१०) श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली.
या सप्ताहाचे हे २३ वे वर्ष आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या सप्ताहाची सुरुवात झाली. यावेळी गणपती पुजन सदाशिव बिराजदार, ज्ञानेश्वरी पुजन दत्तात्रय बिराजदार, संत तुकाराम गाथा पुजन पोलीस निरीक्षक अजित चिंतळे, संत ज्ञानेश्वर महाराज फोटो पुजन चंद्रकांत पाटील, संत तुकाराम महाराज फोटो पुजन अभिमान खराडे, संत मारुती महाराज फोटो पुजन नगरसेवक अविनाश माळी, विठ्ठल रुक्मिणी फोटो पुजन शंकर जाधव, गणपती पुजन काशिनाथ स्वामी, राधा कृष्ण फोटो पुजन उमाकांत भरारे, सरस्वती फोटो पुजन ओम कोरे, तात्यासाहेब वासकर महाराज फोटो पुजन शंकर जटटे, हार्मोनियम पुजन रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, मृदंग पुजन दिपक मुळे, टाळ पुजन नगरसेवक जालिंदर कोकणे, संत गोरोबा काका फोटो पुजन पत्रकार गणेश खबोले, ह.भ.प.गहिनीनाथ महाराज फोटो पुजन अमित बोराळे, विना पुजन उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, दंडक पुजन शिवाजी माळी, एकनाथ महाराज फोटो पुजन राजु स्वामी, हनुमान फोटो पुजन नगरसेवक प्रशांत काळे, महादेव पार्वती फोटो पुजन नगरसेवक अमिन सुंबेकर, भारतमाता मुर्ती पुजन नगरसेवक विजयकुमार ढगे, के.डि.पाटील, शहाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या अखंड हरिनाम सप्ताहाचे व्यासपीठ ह.भ.प. नवनाथ महाराज सुपतगांवकर आहेत. या सप्ताहाचे आयोजन दि.१६ पर्यंत करण्यात आले आहे. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे ४ ते ६ काकडा, ६ ते ७ नाम जप, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते २ महिला भजन, २ ते ४ गाथा भजन, ४ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, ७ ते ९ भोजन, ९ ते १२ किर्तन असे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी दि. १६ जानेवारी रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प. महेश महाराज माकणीकर यांचे होणार आहे. या सप्ताहाचे आयोजन हरिहर भजनी मंडळाचे नारायण माळी, बालाजी मक्तेदार, भगवान गरड, हरी वाघे, बालाजी माळी, सतिश माळी, सिधदु निर्मळे, सुधाकर बिराजदार, कांत माळी, भरत बादुले, खंडु माळी, जगन्नाथ बादुले, मधुकर भरारे, सुभाष पाटील, अंबादास गरड, सुदाम खराडे, वशिष्ट पांचाळ, गणेश दुबे यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.