वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
स्थानिक गुन्हे शाखा : लातूर येथील- व्यंकट नारायण सितापुरे हे त्यांच्या मित्रांसह दि. 10.10.2022 रोजी 03.00 वा. सु. येडशी येथील लातूर- बार्शी रस्त्याने कार क्र. एम.एच. 24 एएफ 3911 मधून प्रवास करत होते. दरम्यान रस्ता खराब असल्याने कारचा वेग कमी झाल्याचा फायदा घेउन रस्त्याबाजूस उभा असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी कारमधील लोकांच्या नकळत कारच्या पाठीमागील डिकी कशानेतरी उघडून आतमधील एटीएम कार्ड, बँक पासबुक, कागदपत्रे व 70,000 ₹ रोख रक्कम असलेली सुटकेस चोरुन नेली होती. अशा मजकुराच्या व्यंकट सितापुरे यांनी दि. 10.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गुन्हा क्र. 202/2022 हा भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत नोंदवला आहे.
सदर गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी- अंमलदार हे बुधवार दि. 11.01.2023 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, खामकरवाडी पारधी पिढी, ता. वाशी येथील- अनिल आबा काळे याने त्याच्या अन्य तीन साथीदारांसह केला असून अनिल हा सध्या लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा येथे आहे. यावर पथकाने लागलीच तेथे जाउन त्यास ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुशंगाने त्याच्याकडे तपास केला असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने त्याच्या ताब्यातून नमूद गुन्ह्यातील चोरीच्या मालापैकी 12,500 ₹ रक्कम हस्तगत करुन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्या ताब्यात तीन मोटारसायकली मिळुन आल्या. यावर पथकाने त्या मोटारसायकल सांगाडा व इंजीन क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास केला असता त्या तीन्ही मो.सा. जालना जिल्ह्यातील गोंदी पो.ठा. हद्दीतून, लातूर जिल्ह्यातील विवेकानंद चौक पो.ठा. हद्दीतून व नांदेड जिल्ह्यातून चोरीस गेल्या असल्याचे समजले. यावर पथकाने त्या तीन्ही मोटारसायकलसह नमूद रोख रक्कम असा एकुण 92,000 ₹ चा माल हस्तगत करुन अनिल यास ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारे स्था.गु.शा. च्या पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातील चोरीच्या एका गुन्ह्यासह जालना, लातूर व नांदेड जिल्ह्यांतील एकुण 3 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला असुन गुन्ह्यातील त्याच्या अन्य तीन साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, प्रदीप वाघमारे, फरहान पठाण, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर, महेबुब अरब यांच्या पथकाने केली आहे.