Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

गुढीपाडवा विशेष ; लोहारा तालुक्यातील भातागळी गावात उभारली जाते एकच गुढी – शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
गुढीपाडवा सणानिमित्त प्रत्येक जण आपापल्या घरासमोर गुढी उभा करतो. आणि हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करतो. परंतु लोहारा तालुक्यात एक असे ही गाव आहे की ज्या गावात एकच गुढी उभा केली जाते. तालुक्यातील भातागळी गावात एकच गुढी उभारली जाते. याहीवर्षी मोठ्या उत्साहात ही गुढी उभारण्यात येणार आहे.
मागील अनेक वर्षापासून लोहारा तालुक्यातील भातागळी गावात चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याला संपूर्ण गावातर्फे एकच गुढी म्हणजेच महादेवाची काठी महादेव मंदीरात उभारली जाते. शंभु महादेवाची अर्धागिनी असलेल्या पार्वतीचा अवतार समजून काटीची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना करण्यात येते. मागील शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा अद्याप ही कायम सुरु असुन बुधवारी ( दि. २२) भातागळी गावात एकच गुढी उभारण्यात येणार आहे.

\"गुढीपाडवा\"

लोहारा तालुक्यातील भातागळी गावात मागील अनेक वर्षांपासून दर वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी कोणाच्याच घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा नाही. गावची गुढी एकच ती म्हणजे शंभो महादेवाची काठी उभारली जाते. ही काठी बुधवारी ( दि. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास उभारण्यात येणार आहे. या गावातील भक्त गुढी पाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच २५ मार्चला पहाटे शेकडो भक्तमंडळी या महादेवाच्या काठीबरोबर पायी चालच ही शंभो महादेवाची काठी घेवून शिखर शिंगणापूरला जातात. साधारण भातागळी ते शिखर शिंगणापूर हे अंतर जवळपास ३०० किमीचे आहे. पायी प्रवास करत हे अंतर भक्त सहा दिवसात पूर्ण करतात. ही काठी भातागळी, लोहारा,उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातून प्रवास करत शिंगणापूर येथे जाते. ही काठी शिखर शिंगणापूरात मानाची काठी आहे.

\"गुढीपाडवा\"

ही काठी परत गुढी पाडव्यानंतर येणाऱ्या पोर्णिमेला म्हणजे ६ एप्रिलला गावात येते. यादिवशी काठीच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव व परीसरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यात महीला भक्तांची संख्या लक्षणीय असते. यादिवशी पासून तीन दिवस यात्रा असते. या यात्रेसाठी जे गावातील नागरीक कामधंद्यासाठी, नोकरीला बाहेर आहेत. ते गावाकडे येतात. विशेष म्हणजे सर्व जातीधर्माचे लोक या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सामील होतात. तसेच यात सर्व जाती धर्माच्या लोकांना मानाचे स्थान आहे.

Ad 2
Ad 1
Tags: गुढीपाडवा
Previous Post

लोहारा तहसिल व पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहामध्ये साफसफाई अभावी दुर्गंधी; साफसफाई न केल्यास संभाजी ब्रिगेड करणार आंदोलन

Next Post

अंतरिक्ष सहलीसाठी निवड झाल्याबद्दल कास्ती बु. शाळेतील विद्यार्थिनीचा सत्कार

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

अंतरिक्ष सहलीसाठी निवड झाल्याबद्दल कास्ती बु. शाळेतील विद्यार्थिनीचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!