वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – लोहारा — सुमित झिंगाडे
लोहारा तालुक्यातील खेड येथे बुधवारी (दि. १९) खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत बीबीएफ पेरणी यंत्र धारक शेतकऱ्यांचे तसेच ट्रॅक्टर चालक व मालक यांचे पहिले प्रशिक्षण घेण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी एस. ए. तराळकर, कृषी पर्यवेक्षक जि. एस. सगर, कृषी सहाय्यक एन. बी. पाटील यांनी बीबीएफ पेरणी यंत्र द्वारे पेरणी करण्याचे फायदे त्याचप्रमाणे बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच बीबीएफ पेरणी यंत्र जोडणी, बियाण्यास बीजप्रक्रिया कशी करावी, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकांतर्गत महाडीबीटी मध्ये ऑनलाईन अर्ज करणे, एम.आर.जी एस. अंतर्गत फळबाग लागवड अर्ज सादर करणे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी शेतकरी रामानंद कापसे, निळकंठ पाटील, शिवराय सिद्धेश्वर, बसवराज पाटील, नवनाथ काकडे, शरणाप्पा कडबाने, गौतम बेलकुंडे, हनुमंत पाटील, पांडुरंग गव्हाळे, बाबू राठोड, वसंत कडबाने, काकासाहेब पाटील, प्रकाश गव्हाळे, तुकाराम सगर, इंद्रजीत गरड, दिलीप कुलकर्णी, सिद्धेश्वर गव्हाळे, शंकर कापसे, दत्तात्रय शिवराय, केशव पाटील, वैजनाथ गव्हाळे, खलील शेख, फिरदोस शेख, अमोल कडबाने, ज्योती ईश्वर जाधव, दादाराव गव्हाळे, शिवानंद पाटील, मोठ्या संख्येने उपस्थित होते.




