स्थानिक गुन्हे शाखा :- अपसिंगा, ता. तुळजापूर येथील अतुल सोमनाथ गोरे यांची अंदाजे रु. 25,000 किंमतीची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 25 ए ए 6143 ही दि.30.05.2023 रोजी 07.00 ते 08.00 वा. दरम्यान छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडत लाईन उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. अशा मजकुराच्या अतुल गोरे यांनी दि. 01.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद पोलीस ठाणे येथे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तसेच सिध्दार्थनगर, सांजा येथील रोहन किशोर माने यांची रु. 15,000 किंमतीची हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एक्स 9125 ही दि.10.01.2023 रोजी रात्री 9 वाजनेच्या सुमारास तेरणा इंजिनीअरींग कॉलेज समोर उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. अशा मजकुराच्या रोहन माने यांनी दि. 02.06.2023 रोजी दिलेल्या. प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र. 191/2023 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे. गुन्हा क्र. 188/2023, गुरनं 92/2022 भा.द.स. कलम 379 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास दि. 02.06.2023 रोजी गोपनिय माहिती मिळाली की, तुळजापूर नाका, उस्मानाबाद येथील ईसम नामे- अहमद अली शेख रा. तुळजापूर नाका, उस्मानाबाद याच्याकडे चोरीच्या मोटरसायकली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर ठिकाणी जावून नमुद इसमास तुळजापूर नाका येथुन ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्य पुर्ण तपास करुन त्याचेकडून वर नमूद गुन्ह्यातील 3 मोटरसायकल जप्त केल्या. सदर आरोपीस चोरीच्या नमूद मोटारसाकलसह पुढील कारवाईस्तव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक श्री. यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अशोक ढगारे, रविंद्र आरसेवाड, बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.