Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहाऱ्यात उद्या शासन आपल्या दारी अभियान

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरात शुक्रवारी (दि.९) महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोहारा तहसिल कार्यालयाच्या वतीने तहसीलदार संतोष रुईकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.९) हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नवीन आधारकार्ड काढणे, दुरुस्ती करणे, नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे / नाव वाढविणे, जीर्ण / खराब शिधापत्रिका बदलणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धापकाळ / विधवा / दिव्यांग राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना , नवीन वीज कनेक्शन अर्ज स्वीकृती ( घरगुती), वीजबिल दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी करणे, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती, दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज भरणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती, जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती यासह इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

\"शासन\"

Tags: शासन आपल्या दारी
Previous Post

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

पुरस्कार मिळाल्याबद्दल वर्गमित्रांनी केला सत्कार – जेवळी येथील १९९५ साली दहावी उत्तीर्ण वर्गमित्रांचा अनोखा उपक्रम

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

पुरस्कार मिळाल्याबद्दल वर्गमित्रांनी केला सत्कार - जेवळी येथील १९९५ साली दहावी उत्तीर्ण वर्गमित्रांचा अनोखा उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!