Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ढोकी पोलिसांनी केली अकरा इसमांची सुटका

admin by admin
17/06/2023
in क्राईम न्यूज, ब्रेकिंग
A A
0

आज दि.17.06.2023 रोजी 09.00 वा. सु. पोलीस स्टेशन ढोकी येथे माहिती प्राप्त झाली की, वाखरवाडी, ता. जि. उस्मानाबाद येथे संदिप रामकिसन घुकसे, वय 23 वर्षे रा. कवठा, ता. सेनगाव जि. हिंगोली यास बळजबरीने पकडून ठेवून त्याचेकडून दिवसभर विहीरीचे काम करुन घेतात. अशी माहिती मिळाल्यावरुन ती माहिती मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांना देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि बुध्देवार, सपोफौ/816 सातपुते, पोह/48 शेळके, पोना/1871 क्षिरसागर, पोना/1760 तरटे, पोकॉ/916 शिंदे, पोकॉ/188 शिंदे, पोकॉ/529 गोडगे असे पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून शेध घेतला असता त्याठिकाणी 1) भगवान अशोक घुकसे, 26 वर्षे, रा. कवठा ता. सेनगाव जि. हिंगोली हा मिळून आला, त्याचे सोबत इतर 5 इसम नामे 2) मारुती पिराजी जटाळकर, वय 40 वर्षे,रा. आतकुर, ता. धर्माबाद, 3) राजू गनुलाल म्हात्रे, वय 22 वर्षे रा मध्येप्रदेश, 4) मंगेश जनार्दन कानटजे वय 26 वर्षे, रा. कुलमखेड, मा. बुलढाणा, 5)बालाजी शामराव वाघमारे, वय 32 वर्षे, रा.लिंबा, ता. देगलूर जि. नादेंड, 6) गणेश अशोक पवार, वय 30 वर्षे, रा. नाशिक असे मिळून आले आहे. वाखरवाडी येथे मिळून आलेल्या इसमांकडे चौकशी केली असता संदिप रामकिसन घुकसे हा मौजे खामसवाडी येथील विहीरीवर असल्याचे माहिती देवून त्यांना सोबत घेवून चला अशी विनंती केली, त्यावरुन वाखरवाडी येथील मिळून आलेले सहा इसमांना सोबत घेतल्यावर त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी माहिती दिली. की, संतोष शिवाजी जाधव(गुतेदार) व इतर एक हे दिवसा बळजबरीने विहीरीवर आमचेकडून काम करुन घेतात व संध्याकाळी आमचे हाता पायाला पळून जावू नये म्हणून साखळीने ट्रॅक्टरला बांधून ठेवतात अशी माहिती दिली.

पोलीस स्टेशन

त्यानंतर आम्ही मौजे खामसवाडी येथे जावून शोध घेतला असता त्याठिकाणी 1) संदीप रामकिसन घुकसे वय 23 वर्षे, रा. कवठा,ता. सेनगाव जि. हिंगोली याचेसह चार इसम नामे 2) भारत ललीत राठोड, वय 26 वर्षे, रा. रुई, ता. मानोरा, 3) शरद दत्ताराव शिंदे, वय 30 वर्षे, रा.आडतोलाजी ता. जालना, 4)अमोल संतोष निंबाळकर, वय 22 वर्षे रा. शिरुभदा, ता. मंगरुल, जि. वाशीम, 5) प्रणव राजेंद्र पवार, वय 29 वर्षे रा. औरंगाबाद असे साखळीने बांधलेल्या, घाबरलेल्या अवस्थेत, एकाखड्यात मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यंचे कडे चौकशी केली असता त्यांना कृष्णा बाळू शिंदे (गुतेदार) रा. भुम व इमर एक यांनी बांधून ठेवून त्यांना मारहाण करुन मृयांचेकडून विहीरीवर काम करुन घेत असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर सदर आकरा घबरलेल्या स्थितत असलेल्या इसमांना पोलीस स्टेशन ढोकी येथे आणण्यात आले असुन त्यावरुन पोलीस स्टेशन ढोकी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे.
पोलीस स्टेशन ढोकी हद्दीतील व शिराढोण हद्दीतुन एकुण आकरा इसमांची सुटका करुन पोलीस स्टेशन ढोकी येथील पोलीस पथकाने व पोलीस मित्र विशाल कानगे यांनी वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली विशेष कामगिरी केली आहे.

ढोकी हद्दीत कोणी संशयीत रित्या दिसल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशन ढोकी येथे कळवणेबाबत याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.

Tags: उस्मानाबाद पोलीस
Previous Post

शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या – आ. ज्ञानराज चौगुले – लोहारा येथे खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठक संपन्न

Next Post

लोहारा येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने गुणवंताचा सत्कार

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात;  आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड
आपला जिल्हा

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड

08/04/2025
विक्रीसाठी घेऊन जात असलेला प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी सुपारी लोहारा पोलिसांनी पकडला; २३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम न्यूज

विक्रीसाठी घेऊन जात असलेला प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी सुपारी लोहारा पोलिसांनी पकडला; २३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

01/03/2025
अवैध आफुच्या झाडाची लागवड; पोलिसांनी केली कारवाई
आपला जिल्हा

अवैध आफुच्या झाडाची लागवड; पोलिसांनी केली कारवाई

17/02/2025
अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला
आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

04/02/2025
Next Post

लोहारा येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने गुणवंताचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's