महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी विवेक बनसोडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
औरंगाबाद येथे झालेल्या नवनियुक्त पदाधिकारी अभिनंदन सोहळ्या दरम्यान महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नेमणुका करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अक्षय काशीद, राजीव जावळेकर, सुमित खामकर, सुमित धस, शिवकुमार नागराळे, अभिजित पतंगे, निलेश जाधव, उमेश चव्हाण, वैभव पांचाळ, गणेश बिराजदार, जयकुमार घोगरे, केतन कदम, सुरज चव्हाण आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.