भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील ( Former MLA Dnyaneshwar patil) यांचे बुधवारी (दि.२) रात्री साडे दहाच्या दरम्यान पुणे (pune) येथील रुबी हॉल (ruby holl) रुग्णालयात निधन झाले.
ज्ञानेश्वर (तात्या) पाटील हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात ते तात्या या नावाने परिचित होते. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यांच्या राजकीय जीवनात अनेक पदे भूषविली. मागील काही महिन्यांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही झाली होती. अखेर बुधवारी (दि.२) माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भूम – परांडा मतदारसंघात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव सकाळी १० ते १२ या वेळेत राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या शेतात दुपारी एकच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.