येरमाळा येथील विद्यानिकेतन विद्यालय येथे, शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद धाराशिव आयोजित, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत धाराशिव जिल्हास्तरीय उल्हास मेळावा 2024 25 चे आयोजन श्रीमती सुधा साळुंखे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धाराशिव यांनी विद्यानिकेतन विद्यालय येरमाळा येथे आयोजन केले होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉ. मैनाक घोष भा प्र से मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा जिल्हाधिकारी धाराशिव यांनी केले. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. डॉ. गणपत मोरे शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर. मा. डॉ. अंजली सूर्यवंशी प्र-प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धाराशिव. मा. श्री अशोक पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव. तसेच धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर,उमरगा, लोहारा, भूम, परंडा, वाशी, कळब प्रत्येक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी आपल्या भाषणात मा. डॉ. मैनांक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव हे म्हणाले की, देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान खूप महत्त्वाचे असून केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन धाराशिव जिल्ह्याच उद्दिष्ट पूर्ण करावे. यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती सुधा साळुंखे आपल्या भाषणात म्हणाल्या उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे मुख्य उद्देश 100% लोकांना साक्षर करणे हा आहे नव साक्षर लोकांना वाचणे, लिहिणे याबरोबर गणित बँकेचे व्यवहार येणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी साक्षर झालेला तालुक्यांची टक्केवारी सुद्धा सांगितले. आपल्या मनोगतातून साक्षरता अभियानाचे महत्त्व विशद केले धाराशीव जिल्ह्यातील नव साक्षरता अभियान संदर्भात होत असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. नव साक्षर भारत अंतर्गत शैक्षणिक साहित्याचे मेळाव्यात 15 स्टॉल लावण्यात आले होते यात शिक्षकांनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू व शैक्षणिक साहित्याची निर्मिती याची मांडणी करण्यात आली होती. स्टॉलचे उद्घाटन शिक्षण अधिकारी सुधा साळुंखे यांनी केले. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शाळातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये पथनाट्य, लोकगीते, नाटिका, इत्यादीचे सादरीकरण केले. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालयातील शाळांनी सहभाग नोंदविला होता. शिक्षक बंधूंनी नव साक्षरांसाठी तयार केल्या साहित्याची प्रदर्शनी घेण्यात आली. तसेच स्वयंसेवक व साक्षर झालेले यांचा सत्कार सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.