शिवसेनेचे उपनेते, विकासरत्न, लोकप्रिय माजी आमदार ज्ञानराज धोंडिराम चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहर शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि.५) शहरात सामाजिक उपक्रम राबवुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत लोहारा शहरातील गरीब कुटुंबातील महिलांना नगराध्यक्षा सौ. वैशालीताई अभिमान खराडे यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीच्या गटनेत्या सौ. सारिका प्रमोद बंगले, नगरसेविका शामल बळीराम माळी, नगरसेविका कमल राम भरारे, नगरसेविका शमाबी आयुब शेख, नगरसेविका सुमन दिपक रोडगे, नगरसेविका आरती ओम कोरे, नगरसेविका संगिता किशोर पाटील, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक हाजी अमिन सुंबेकर, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक विजयकुमार ढगे, नगरसेवक आरिफ खानापुरे, मेडिकल असोशिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी पं.स. सदस्य दिपक रोडगे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, माजी तालुका प्रमुख रवि कुलकर्णी, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, भगवान मक्तेदार, देवा महाजन, राम कुलकर्णी, गोविंद भरारे, युवराज भरारे, सौदागर रणशुर, रोहन खराडे, बाळु कांबळे, विजय वेदपाठक, ज्ञानेश्वर काडगावे, तात्या कांबळे, यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.