लोहारा (Lohara) तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (savitribai phule) यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे हे होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक बालाजी नादरगे, शिक्षिका लक्ष्मी घोडके व महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, भारतमाता, राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर युगप्रवर्तक स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा उल्लेख करत प्रशालेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी व कार्यरत शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन दिव्यांग मुलींनी उच्चशिक्षण घेऊन स्वावलंबी जीवन जगले पाहिजे. व तसेच सामाजिक जडणघडणीत योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन केले. ममता गोटमुखले हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत सुंदर असे गीत गायन सादर केले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका अंजली चलवाड, संध्या गुंजारे, लक्ष्मी घोडके, प्रयागताई पवळे, मंगेश कुलकर्णी, अनंतराव कुकाले, राम बेंबडे, विठ्ठल शेळगे, निशांत सावंत, प्रविण वाघमोडे, संजय शिंदे, आर.पी. गुंडूरे, ज्ञानोबा माने, शकरबावा गिरी, सूर्यकांत कोरे, नारायण हसनाळे, सुरेखा परीट, किरण मैंदर्गी, सुनीता कज्जेवाड, गोरख पालमपल्ले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वाघमोडे व निशांत सावंत यांनी आभार मानले.