‘संघटन पर्व २०२४-२५ भाजपा सदस्य नोंदणी अभियान’ अंतर्गत लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी (दि. ५) कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यात सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सध्या ‘संघटन पर्व २०२४-२५ भाजपा सदस्य नोंदणी अभियान’ अंतर्गत सदस्य नोंदणी करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ लोहारा शहरात रविवारी करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, जिल्हा नोंदणी सहसंयोजक विक्रांत संगशेट्टी, नोंदणी तालुका संयोजक दगडू तिगाडे, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, बबनगिरी महाराज, नोंदणी तालुका सहसंयोजक तथा तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक प्रमोद पोतदार, संजय कदम, तालुका चिटणीस सुरेंद्र काळप्पा, युवराज जाधव, परमेश्वर कदम, प्रसिद्धी प्रमुख निकेश बचाटे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयश दंडगुले, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, जनक कुलकर्णी, विजय महानुर, कल्याण ढगे, सिद्धेश्वर बिडवे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.