Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

by मुख्य संपादक
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज, ब्रेकिंग
A A
0

दि.०२.०२.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक राक्रमस्तीवर असताना त्यांना पो स्टे वाशी हददीत घुलेवा मळा शिवारात सोलापूर बीड हायवेवर एक इसम मयत अवस्थेत पडला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली असता आजूबाजूची परिस्थिती पाहुल पोलीसांना घातपात झाला असल्याचा संशय आला. यातील मयत मुस्तकीन जब्बार शेरार रा साळेगाव ता केज जि बिड ह मु मोहा ता कळंब असल्याचे ओळख पटल्याने तात्काळ त्याचे नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांचेकडून मयताची अकबर नावाचे इसमाबरोबर काही दिवसापुर्वी भांडण झाले असल्याचे समजले. प्राप्त माहितीवरून तात्काळ तपासाची सुत्रे हलविली असता संशयित म्हणून अकबर सरदार शेख, रा पिंपळनेर, ता.जि बीड याचे नाव समोर आले. सदरबाबत पोस्टे वाशी येथे गुरनं ३९/२५ क १०३ (१),३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्री संजय जाधव साो यांना सदरबाबत माहिती देवून त्यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेवे सपोनि कासार व पथक हे तात्काळ संशयित आरोपीवे शोधकामी रवाना झाले. मौजे पिंपळनेर, ता.जि बीड येथे जावून पथकाने संशयित इसमाची माहिती काढून त्याला शिताफिने ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने त्याचा भाउ अमर शेख, वडील सरदार शेख आणि दाजी फारूख शेख सर्व रा. पिंपळनेर, ता.जि बीड यांचे मदतीने यातील मयत याचे त्यांचे बहिणीशी अनैतीक संबंध असल्याच्या कारणावरून वाशी शिवारात नेवून मारून टाकले असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने तात्काळ नमुद ०४ आरोपी व त्यांनी गुन्हयात वापरलेले ०२ मोटार सायकल ताब्यात घेवून त्यांना पुढील कारवाईकामी पोस्टे वाशी येथे हजर केले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरून स्यागुशा, धाराशिव चे सपोनि श्री. सुदर्शन कासार, सपोफी वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले यांच्या पथकाने केली आहे.

Tags: क्राईमधाराशिवस्थानिक गुन्हे शाखा
Previous Post

राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत ५ मिनिट ५६ सेंकदात सर्व प्रश्न सोडवून १०० पैकी मिळवले ९८ गुण

Next Post

स्पर्श रुग्णालयाच्या वतीने करजखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यासाठी रक्तगट तपासणी शिबिर संपन्न

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

स्पर्श रुग्णालयाच्या वतीने करजखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यासाठी रक्तगट तपासणी शिबिर संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!