लोहारा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा व
हायस्कूल लोहारा शाळा येथील इयत्ता पहिलीच्या १९८५ व इयत्ता दहावीच्या १९९५ च्या बॅचच्या वर्गमित्राने तब्बल तीस वर्षानंतर एकत्र येऊन आपल्या आठवणीतील अनमोल क्षणांन उजाळा देत स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. तब्बल तीस वर्षानंतर एकत्र आल्याने वर्गमित्र आपुलकीने एकमेकांची विचारपूस करत होते.
लोहारा शहरात शनिवारी (दि.८) हा स्नेह मेळावा पार पडला. या स्नेह मेळाव्याला एकशे दहा वर्गमित्र उपस्थित राहून आपल्या आठवणींना तीस वर्षानंतर उजळा दिला. यावेळी हायस्कूल लोहारा शाळेतील प्रार्थनेला तीस वर्षानंतर उपस्थित राहुन आपल्या भूतकाळातील दैनंदिन अविस्मरणीय क्षणाला काही वेळा करीता पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट देऊन इयत्ता पहीलीच्या वर्गीत आपला वर्ग भरवला. काही काळ या शाळेत विद्यार्थी झाले. यानंतर आपल्या दोन्ही शाळेतील तत्कालीन गुरुवर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ३५ माजी सेवानिवृत्त सहशिक्षकांचा शाल मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन देऊन सत्कार केला. या कार्यक्रमामध्ये वर्ग मित्र मैत्रिणीचा संवाद, गप्पांची मैफिल, संगीताची मैफील, मनोरंजन कार्यक्रम पार पडले.
शहरातील श्री महात्मा बसवेश्वर महाराज सभागृहात पार पडलेल्या गुरुगौरव कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूल लोहाराचे मुख्याध्यापक दयानंद पोतदार तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय फावडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जि. प. कें. प्रा. शाळा व हायस्कूल लोहारा शाळेतील माजी सहशिक्षक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी वर्ग मित्रांनी आपल्या दोन्ही शाळेचे ऋण फेडण्याकरिता जिल्हा परिषद शाळेला आठ सीसीटीव्ही कॅमेरा व संच भेट देऊन सद्यस्थितीत या शाळेतील जवळपास आठशे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न कायमस्वरूपी मिटविला. तसेच हायस्कूल लोहारा शाळेस कै. ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी नारायणरावजी लोहारेकर स्मृती व्यासपीठ शेडची बांधणी करून दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जसवंतसिंह बायस, अमोल फरीदाबादकर, विठ्ठल वचने, प्रद्युम्न पाटील, अशोक घोडके, सतिष नारायणकर, महेबुब मोमीन, शिवकुमार पाटील, युनूस मोमीन, विरेश देसमाने, सोमनाथ गाडीलोहार, जब्बार मुल्ला, गिरीश संदिकर, कैलास माणिकशेट्टी आदींनी परिश्रम घेतले.
या स्नेह मेळाव्याला दत्तात्रय दंडगुले, दत्ता निर्मळे, दत्ता जावळे, शिवाजी चव्हाण, जब्बार मुल्ला, श्रीकांत पाटील, गोविंद मुळे, बालाजी माटे, मारुती कोळी, अमिना सौदागर, अनिता रोडगे, जगदेवी स्वामी, नीता कदम, जयश्री माणिकशेट्टी, राणी पाटील, मैना शिंदे, सुमित्रा माशाळकर, अन्नपूर्णा लकडे, सुरेखा नरुणे, लता तोडकरी, सुवर्णा मुंडे, ज्योती कुलकर्णी, सुमिता मगर, संगिता भरगंडे, आशा लोभे, अंजली तिगाडे, अनिता रोडगे, प्रमिला गोरे, जना डावकरे, चैञाली स्वामी, अरुणा बादूले, अरुणा कोरे, सुलक्षणा माटे, कुसुम माळी, आर्चना गोरे, शेगजे शोभा, संगिता घोंगडे, सोनाली कुलकर्णी, वैजयंती घोडके, शिला जट्टे, विजया गोरे आदीसह माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक जसवंतसिंह बायस यांनी तर प्रमोद मगर यांनी आभार मानले.
