Vartadoot
Tuesday, July 21, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता

मुख्य संपादक by मुख्य संपादक
18/02/2026
in लोहारा तालुका
A A
0
दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता
Ad 10

लोहारा येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त सोमवारी (दि.१६) कुस्तीप्रेमींसाठी कुस्त्यांचा फड आयोजित करण्यात आला होता. अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम कुस्तीत भुसनी येथील दिपक सगरे याने विजय मिळवला. अंतिम कुस्ती निकाली निघताच कुस्तीप्रेमींनी एकच जल्लोष केला. यात हासेगाववाडी येथील तुकाराम महानूर उपविजेता ठरला. यावेळी कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
लोहारा शहरात महाशिवरात्री यात्रामहोत्सवानिमित्त मागील तीन दिवसापासून शहरात विविध कार्यक्रम होत आहेत. यात्रामहोत्सव समितीच्या वतीने सोमवारी (दि. १६) भव्य कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन झाले. यावेळी माजी सरपंच शंकर जट्टे, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, भागवत बनकर, राम जाधव, सुग्रीव रसाळ, महाशिवरात्री यात्रा महोत्सव कमिटीचे अध्यक्ष ओम पाटील, नगरसेवक विजयकुमार ढगे, गोपाळ सुतार, विठ्ठल वचने यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले. या कुस्तीच्या आखाड्यात तालुक्यासह इतर जिल्ह्यातील नामवंत मल्ल सहभागी झाले होते. सायंकाळी साडे पाच वाजता सुरू झालेल्या कुस्त्या रात्री साडे दहा वाजता संपल्या. १०० रुपयांपासून २० हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या झाल्या. या दरम्यान लोहारा येथील सद्गुरू कुस्ती संकुलाच्या मल्लांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सदगुरू कुस्ती संकुलाच्या लोहारा येथील शंकर मक्तेदार याने पाच हजार रुपयांची कुस्ती जिंकून उपस्थितांची दाद मिळवली.शेवटची कुस्ती माजी सरपंच शंकर जट्टे, बलभीम रसाळ, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.


अंतिम कुस्तीसाठी सहा जणांची नोंदणी झाली होती. त्यामुळे लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून लॉट्स पध्दतीने कुस्त्या लावण्यात आल्या. भुसनी येथील दिपक सगरे व हासेगाववाडी येथील तुकाराम महानूर यांच्यात अंतिम कुस्ती झाली. ही कुस्ती जवळपास वीस मिनिटे चालली. अखेर ही कुस्ती दिपक सगरे याने जिंकली. कुस्तीचा निकाल लागताच उपस्थितीतांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपक सगरे याला जट्टे कुटुंबियांच्या वतीने ३१ तोळे महादेवाची चांदीची पिंड देऊन गौरविण्यात आले. उपविजेता तुकाराम महानूर याचाही सत्कार करून त्याला संजय रसाळ यांच्या ५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. यावेळी शंकर जट्टे, चंद्रकांत पाटील, विठ्ठल वचने, श्रीनिवास माळी, महाशिवरात्री यात्रा महोत्सव कमिटीचे अध्यक्ष ओम पाटील, अमोल बिराजदार, गोपाळ सुतार, अभिमान खराडे, दिपक रोडगे, सतिश ढगे, विरेश स्वामी, भीमाशंकर डोकडे, बलभीम रसाळ, प्रभाकर बिराजदार, ईश्वर बिराजदार, हरी लोखंडे, संतोष फावडे, रामेश्वर कार्ले, दयानंद साळुंके, अमित बोराळे आदींसह कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी पंच म्हणून रामेश्वर कार्ले, दयानंद साळुंके, मोहन वचने, महेश कुंभार यांनी काम पाहीले. यावेळी जवळपास दोनशे मल्लांनी सहभाग नोंदविला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कुस्तीमहाशिवरात्रीयात्रा महोत्सव लोहारालोहारा केसरी
Previous Post

मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम

Next Post

लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध

Related Posts

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
Next Post
लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध

लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's