लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९९.३३ टक्के लागला आहे. साक्षी रणखांब हिने ९०.१७ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून व वाणिज्य शाखेतून, श्रेयस थिटे याने ७९.३३ टक्के गुण घेत विज्ञान शाखेतून तर प्रतिक्षा दळवे हिने ७३ टक्के गुण घेऊन कला शाखेतून प्रथम क्रमांक पटकावला. महाविद्यालयातून एकूण १५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९९.३३ टक्के लागला असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य प्रा. स्नेहलता करदुरे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.