लोहारा तालुक्यातील होळी येथे आज सायंकाळी ७ वाजता व्यसनमुक्तीतून प्रगतीकडे, प्रगतीतून विकासाकडे ‘एकच ध्यास गावचा सर्वांगीण विकास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच भास्कर पेरे पाटील उपस्थित राहणार आहेत.
ग्रामपंचायत होळी व ग्रामपूरस्कृत लोककल्याण कृती समिती होळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होळीच्या सरपंच सरोजा बिराजदार या राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी धाराशिवचे पोलीस निरीक्षक संजय जाधव, उमरग्याचे पोलीस उपअधिक्षक सदाशिव शेलार, लोककल्याण कृती समितीचे मुख्य समन्वयक बी. आर. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शनिवारी (दि.३०) सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तसेच रविवारी (दि.१) सकाळी आठ वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमांसाठी गावातील महिला व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.