लोहारा तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी (दि.१४) बालदिन साजरा करण्यात आला.
तालुक्यातील आरणी येथील शाळेत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला. शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीचे काही विद्यार्थी नेहरूंच्या वेशभूषेत आले होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पांचाळ, सहशिक्षक बाळासाहेब कदम, मेघराज कदम, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुप्रिया माळवदकर, प्रिया दरेकर यांनी फुले देऊन सर्व बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. व मिठाई वाटून बालकांचे तोंड गोड केले.













