लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथील हुलसुरे कुटुंबीयांच्या शेतातील गोठ्यास अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. यात गोठ्यातील जनावरांचा कडबा, स्प्रिंकलर सट, पाणबुडी मोटार आदी शेती उपयुक्त साहित्य जळाल्याने श्री. लिंबराज हुलसुरे या शेतकऱ्याचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले होते. केवळ अडीच एकर शेती असलेले हुलसुरे पती-पत्नी दोघेही शेतात काबाड कष्ट करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. कालच्या दुर्घटनेमुळे हुलसुरे कुटुंबीयांवर खूप मोठे संकट ओढावले. या घटनेची माहिती मिळाली असता ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी हुलसुरे यांच्या शेतात जाऊन दुर्घटना स्थळाची पाहणी केली व सौ.हुलसुरे या महिला शेतकऱ्याशी चर्चा केली. जनावरांचा चारा जळाल्यामुळे सौ. हुलसुरे यांनी चाऱ्याची सोय करावी अशी मागणी केली असता ॲड. आकांक्षा चौगुले यांनी चाऱ्यासाठी मदतही केली.
तसेच लोहारा तहसीलदार काशिनाथ पाटील यांना फोन करून सदर घटनेचा पंचनामा करून या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळवून देण्याची विनंती केली. यावेळी कास्ती खुर्द सरपंच सागर पाटील, कास्ती बुद्रुकचे परवेज तांबोळी, लोहारा शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, माजी सरपंच बलभीम सरवडे, पिंटू शेकजी, सतीश पाटील, संदीप वकील, वीरभद्र हुलसुरे, अरुण सूर्यवंशी, आबा पाटील, युवा सैनिक आकाश पवार आदी जण उपस्थित होते.