विनोबा ॲपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सुनंदा निर्मले व आसिफा सय्यद या शिक्षिकांचा लोहाऱ्यात सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषद धाराशिव व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात धाराशिव जिल्हयातील लोहारा तालुका स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते शिक्षक सुनंदा निर्मले (कलशेट्टी), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी व असिफा सय्यद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंडरगाव तालुका लोहारा यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील पुरस्कार मा. श्री. सुभाष चव्हाण साहेब (गटशिक्षणाधिकारी लोहारा) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला श्री. लहाने अनंत – विषय साधन व्यक्ती, मल्लिकार्जून कलशेट्टी, रफिक शेख व इतर शिक्षक, कर्मचारी व आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक प्रशिक्षण कार्यक्रम चे प्रकल्प अधिकारी सोमनाथ स्वामी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व तालुक्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.