Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

माकणी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील माकणी (makni) येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. ८) या सप्ताहास सुरुवात झाली असून दि. १४ रोजी श्री च्या काठीची सवाद्य मिरवणूक व सायंकाळी ५ च्या सुमारास काल्याचा कार्यक्रम होणार आहे.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त दरवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून रविवारी (दि. ८) या सप्ताहास सुरुवात झाली. या सप्ताह कालावधीत पहाटे चार ते सहा काकडा आरती, सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा हरिपाठ तर रात्री नऊ ते साडे अकरा या कालावधीत कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. या सप्ताहात गुरुवर्य महेश महाराज माकणीकर, गुरुवर्य मठाधीश शामचैतन्य महाराज, विश्वनाथ गर्जे महाराज (माळेगाव), किशोर महाराज (राजखेडकर), नंदकुमार पांचाळ महाराज (हरंगुळ), विठ्ठल गजगे महाराज (परभणी), कृष्णा महाराज चवरे (पंढरपूर ), फुलचंद कांबळे महाराज, दिलीप ताटे महाराज, शेषेराव करदोरे महाराज, प्रभाकर बनसोडे महाराज (उदतपुर), वसंत बोंडगे महाराज (हसलगण) आदी नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांचे कीर्तन व प्रवचन होणार आहेत.
दि. १४ डिसेंबर रोजी श्री च्या काठीची सवाद्य मिरवणूक व सायंकाळी ५ च्या सुमारास काल्याचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या जंगी कुस्त्यांचा फड दि. १५ डिसेंबर रोजी होणार आहेत. शेवटच्या कुस्तीतील विजेत्या मल्लास रु. २१ हजार एक व चांदीची गदा देण्यात येणार आहे. गुरुवर्य विरभद्रप्पा स्वामी शिऊरकर, मठाधिपती शामचैतन्य महाराज माकणीकर व महेश महाराज माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहातील कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाची ग्रामपंचायत कार्यालय, यात्रा कमिटी व ग्रामस्थाकडून जय्यत तयारी सुरू असून याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: माकणीसिद्धेश्वर यात्रा महोत्सव माकणी
Previous Post

माकणी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; आमदार प्रवीण स्वामी यांनी केले उद्घाटन

Next Post

विनोबा ॲपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षिकांचा सन्मान

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

विनोबा ॲपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षिकांचा सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!