लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त बुधवारी ( दि. २७) कुस्त्यांची दंगल झाली. या स्पर्धेत आकाश देशमुख (टाका) व प्रशांत जाधव (कोंड) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. जवळपास जवळपास १५ मिनिटे चाललेली ही कुस्ती कोण जिंकणार अशी उत्सुकता कुस्तीप्रेमींना लागून होती. अखेर ही कुस्ती आकाश देशमुख (टाका) यांनी जिंकली. कुस्त्या पाहण्यासाठी माकणीसह पंचक्रोशितील हजारो कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा मंगळवारी ( दि. २६) सुरु झाली. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यात्रेचे मुख्य आकर्षण
असलेल्या कुस्तीच्या स्पर्धा बुधवारी (दि. २७) पार पडल्या. सिद्धेश्वर मंदिरासमोरील मैदानात ही कुस्ती स्पर्धा पार पडली. यातील अनेक मल्लांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. आकाश देशमुख (टाका) व प्रशांत जाधव (कोंड) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. ही कुस्ती जवळपास १५ मिनिटे चालली. अंतिम कुस्ती विजेत्या आकाश देशमुख (टाका) १५ हजार रुपये व चांदीची गदा देण्यात आली. यावेळी माकणीसह पंचक्रोशीतील मल्लांच्या कुस्त्यांची लक्षवेधी ठरल्या. कुस्त्या पाहण्यासाठी माकणीसह परिसरातील कुस्तीप्रेमींना मोठी गर्दी केली होती.