अनेकदा कित्येक खेडेगावात मुलींना शिक्षणासाठी शहरात पाठवण्यास विरोध होतो. ऐपत असुनही पालकांच्या मानसिकतेतुन मुलींच्या शिक्षणासाठी नकारार्थी भावना दिसुन येते. मुलींच्या लग्नासाठी पैसा जमा करावे लागते, यात मुलीला शिक्षण देणे तर अवघडच. अशात आर्थिक स्थिती कमकुवत, त्यात ३ मुलींचा लग्नाचा खर्च. अशा परिस्थितीत शिक्षण कसे करायचे असा विचार मनात येणे साहजिक आहे. परंतु जीप ड्रायव्हर असणाऱ्या पित्याने जिद्दीने चार मुलांचे शिक्षण पूर्ण केले. तालुक्यातील आष्टाकासार येथील रहिवासी प्रकाश बलसुरे हे व्यवसायाने जीप ड्रायव्हर. पण जिद्दीने ३ मुली व एका मुलाला गरिबीवर मात करत उच्च शिक्षण दिले. उच्च शिक्षण देऊन चौघांनाही इंजिनियर करून नोकरीवर लावले. घरची परिस्थिती नाजूक असुन या परिस्थितीवर मात करीत आई-वडिलांचे नावलौकिक केले. आपल्या आई-वडिलांची कमाई तुटपूज्य असूनही मुलांनीही कधी शिक्षणातून माघार घेतली नाही. जीपच्या कमाईवर आपत्यांना जिद्दीने शिक्षण दिले. मुलींच्या, मुलांच्या जिद्दीमुळे चारही अपत्य उच्च शिक्षित झाले. पण आई-वडील १० वी नापास असून सुद्धा जिद्दीने मुलांना शिक्षण दिले. आपलं आयुष्य पत्र्याच्या घरी गेलं. पण आई वडील हे इतक्या हालाकीतुन सुद्धा आपल्याला शिक्षण दिलेत. याची जान मुलींनी ठेवून आई-वडिलांना बंगला बांधून देऊनच ऋणातून मुक्त होऊ, मुलींनी आईचे वडिलांचे हे ऋण फेडल्या शिवाय लग्न करून घ्यायचेच नाही असे ठरवून आष्टा कासार येथे सुंदर असा टोलेदार बंगला बांधून बंगल्याच्या चाव्या आई-वडिलांकडे सुपूर्द केल्या. आई-वडिलांचे पांग फेडले. आता राहण्यासाठी घर झाले. आई-वडिलांनां आता तुमच्या म्हणण्यानुसार आमचे लग्न करण्यास सहमती दर्शविली. मुलगा पुणे येथे, ३ मुली मुंबई येथे चांगल्या पॅकेजवर इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. अशा ह्या देहवेड्या कुटुंबाचं आष्टा कासार येथे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. अशा या जिद्दी मुलांचे सेवानिवृत्त शिक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्था आष्टा कासार यांच्यासह ग्रामस्थांतून कौतुक केले जात आहे.
——————–
आई वडिलांनी खूप कष्टाने आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण केले आहे. आम्ही त्यांचे ऋण कधीही फेडू शकणार नाही. ग्रामीण भागात मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवणे म्हणजे खूप अवघड गोष्ट. अशी परिस्थिती असतानाही आमच्या आई वडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवले. या सर्व परिस्थितीची जाणीव आम्हाला आहे.
रुपाली बलसुरे, इंजिनिअर
