लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात गुरुवारी (दि. २०) इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील सालेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यालयातील दहावी परीक्षेत विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भाग्यश्री पाटील या होत्या. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात दहावी परीक्षेत विद्यालयातून प्रथम आलेली कु. अस्मिता शाहूराज मातोळे, द्वितीय आलेला सोहेल इसूफ पठाण, तसेच तृतीय आलेली ज़ाराफातिमा रिहाल शेख, शुभम सतीश बडूरे यांच्यासह विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झालेल्या २४ विद्यार्थ्यांचा हार व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एमएनएनएमएस मध्ये पात्र विद्यार्थी अविष्कार घोगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. रोहीणे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ माने यांनी तर व्ही. एम. गोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.