लोहारा शहरातील श्री जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्समध्ये काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीतील मुद्देमाल शुक्रवारी (दि. १२) पोलिसांनी ज्वेलर्सच्या मालकाच्या स्वाधीन केला.
लोहारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान आहे. या ज्वेलर्सवर दि. १५ जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास अज्ञातांनी दरोडा टाकून दुकानातील दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी पुणे वारजे माळवाडी येथे चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना तेथील पोलिसांनी पकडले होते. यात एका चोरट्यासह गाडी ताब्यात घेण्यात आली होती. या गाडीतून लोहारा येथील ज्वेलर्सच्या चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला होता. लोहारा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि. १२) उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी हा मुद्देमाल जयलक्ष्मी ज्वेलर्सचे मालक अविनाश माळी यांच्या स्वाधीन केला. यामध्ये जोडवे, ब्रासलेट, वाळे, चैन, किचन, अंगठी, कडे, ताट, सर्व चांदीच्या वस्तूचा समावेश होता. जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्स यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्वेलर्सचे मालक अविनाश माळी, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, राजेंद्र माळी, सराफ संघटनेचे संभाजी पोतदार, अभिमान खराडे, माजी पं.स. सदस्य इंद्रजीत लोमटे, दिपक रोडगे, आप्पासाहेब पाटील, इकबाल मुल्ला, पोलीस कर्मचारी निरंजन माळी, आकाश भोसले, अर्जुन तिगाडे, ज्योतीराम भोजने, माधव कोळी यांच्यासह सोसायटी चेअरमन बालाजी बाबळे (मोघा), ग्रामपंचायत सदस्य नारायण क्षीरसागर (हिप्परगा रवा), राजेंद्र सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, शाम राठोड शहरातील ज्वेलर्स दुकानदार अहेमद शेख, पिंटु पोतदार, महेश पोतदार, दत्ता पोतदार, शुभम महामुनी, ज्ञानेश्वर काडगावे, मधुकर पवार, सुनिल मोरे, होमगार्ड बिलाल गवंडी, अजहर सिद्दीकी, प्रकाश कोकरे, योगेश परसे यांच्यासह ज्वेलर्स दुकानदार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.







