लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (दि.१२) राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुंबई येथील यश पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला.
लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात शुक्रवारी (दि.१२) ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी सोशल मीडियाच्या चक्रव्यूहात भारतीय तरुणाई हा विषय देण्यात आला होता. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील होते. यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, डॉ. अनिता मुदकण्णा (जवाहर महाविद्यालय अणदूर), परीक्षक प्रा. डॉ. लक्ष्मण बिराजदार, (आदर्श महाविद्यालय उमरगा) प्रा. डॉ. तुळशीदास उकिरडे (तेरणा महाविद्यालय धाराशिव), प्रा.डॉ. अरविंद हंगरगेकर (रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव), प्रा. दत्ता कोटरंगे, प्रा.डॉ.मनोज सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील एकूण २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या दरम्यान स्पर्धकांनी सोशल मीडियाच्या चक्रव्युहात भारतीय तरुणाई या विषयावर आपापली मते मांडली. या वकृत्व स्पर्धेत यश रवींद्र पाटील (मुंबई विद्यापीठ, मुंबई) याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला ११ हजार ५१ रूपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, रमेश सुनिल कचरे (एस. पी. कॉलेज पुणे) याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यास ७ हजार ५१ रूपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, गिता माधव वाडकर (महाराष्ट्र महविद्यालय निलंगा) हिने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना ५ हजार ५१ रूपये व स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच आदित्य ज्ञानेश्वर दराडे (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छ्त्रपती संभाजीनगर) याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. त्यास २ हजार ५१ रुपये, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी प्रा.डॉ. विनायक पाटील, मनोज पाटील, संतोष पाटील, डॉ. रामहरी सुर्यवंशी, डॉ. शिवाजी कदम, डॉ. सुदर्शन सोनवणे, डॉ. भैरवनाथ मोटे, डॉ. प्रभाकर गायकवाड, डॉ. बालाजी राजोळे, डॉ. छाया कडेकर, डॉ. पार्वती माने, डॉ. सुर्यकांत बिराजदार, डॉ. संदीप कोरेकर, विनोद आचार्य डॉ. रामेश्वर धप्पाधुळे, बालाजी सगर, डॉ. शिरीष देशमुख, नंदकुमार माने, प्रविण पाटील, प्रकाश राठोड, परमेश्वर कदम, संजय फुगटे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज सोमवंशी यांनी तर प्रा. विनोद आचार्य यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे –
प्रथम – यश रवींद्र पाटील (मुंबई विद्यापीठ, मुंबई),
द्वितीय – रमेश सुनिल कचरे (एस. पी. कॉलेज पुणे),
तृतीय – गिता माधव वाडकर (महाराष्ट्र महविद्यालय निलंगा)
उत्तेजनार्थ – आदित्य ज्ञानेश्वर दराडे (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छ्त्रपती संभाजीनगर)






