जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांच्या कल्पनेतून घेण्यात आलेल्या स्पेलिंग बी उपक्रमा अंतर्गत लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथे घेण्यात आलेल्या बीटस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा खुर्द येथील विद्यार्थी विराज मारुती भोंडवे व विराज विकास घोडके याने यश मिळवले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शाळेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक विकास घोडके व सहशिक्षिका यु.व्ही. बर्डे यांच्या हस्ते सत्कार करून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना शामची आई हे पुस्तक देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे नंदकुमार गरगडे, अंगद भोंडवे, मोहन गोरे, शिवहरी दळवे, मारूती भोंडवे यांनी अभिनंदन केले.