लोहारा तालुक्यातील माकणी (Makni) येथील भारत विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने शनिवारी (दि.५) शिक्षक दिन (Teacher Day) उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक व्यंकटराव गुंजोटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्राध्यापक शशिकांत साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य व्यंकटराव गुंजोटे, पर्यवेक्षक गणेश साठे, प्राध्यापक शशिकांत साठे, किशोर पवार, अजित

गायकवाड, दीपक शिंदे, उमेश कडले, प्रभाकर बनसोडे, नशीबपाशा मुजावर, रामराव पवार, विजय पवार, राघवेंद्र चौधरी, शुभांगी शिंदे, आळंगे, स्वप्निल मोरे, श्री. गोरे, श्री डिग्गीकर यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षकांचा दहावीच्या मुलींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्पिता कडले या दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमात अक्षरा साठे, श्रावणी कुलकर्णी, दिव्या ओवांडकर, सई जावळे, प्रगती मल्लाडे, प्रतीक्षा मल्लाडे, पियुष गायकवाड या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात व्यंकटराव गुंजोटे यांनी विद्यार्थी अवस्थेत गुरुचे महत्व किती असते याविषयी मार्गदर्शन केले. तनिष्का साठे या विद्यार्थिनीने आभार मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









