Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील बाल आनंद मेळाव्यातून झाली सात हजार रुपयांची उलाढाल

मुख्य संपादक by मुख्य संपादक
18/03/2024
in Blog
A A
0
लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील बाल आनंद मेळाव्यातून झाली सात हजार रुपयांची उलाढाल

लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (दि.१८) बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सात हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.
या बाल आनंद मेळाव्याची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली. सचिन गोरे, नंदकुमार गरगडे, केंद्रप्रमुख विश्वजित चंदनशिवे, साधनव्यक्ती रविशंकर आगळे, अंगद भोंडवे यांनी पूजन केले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांचे २० स्टॉल लावले होते. यामध्ये पाणीपुरी, गुलाबजामून, अप्पेवडे, धपाटे, भेळ, सरबत, पावभाजी, चिवडा, बासुंदी, इडली सांबर, चहा, मठ्ठा, मंचुरियन, वडापाव, समोसे, उडीदवडा, मिरची भजे, मेंदूवडा, उकडलेले अंडे, चुरमुरा, शेंगा लाडू आदी स्टॉल लावण्यात आले होते. त्याचबरोबर किराणा दुकान व हरे एक माल, प्लास्टीक खेळणी दुकान लावण्यात आले होते. विविध पदार्थाच्या मेजवानीला नागरीक, पालकांकडून मोठा प्रतिसाद दिसून आला. तासाभरात सर्व पदार्थाची विक्री होवून पुन्हा विविध पदार्थ बनवावे लागले. पाणी पुरी, धपाटे, बासुंदी, पावभाजी, अप्पेवडे, इडली सांभर, मठ्ठा या स्टॉलला मोठा प्रतिसाद दिसून आला. यावेळी नागरीकांनी पदार्थांच्या मेजवानीचा अस्वाद घेत विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञानाचे धडे देवून पैसे देताना परीक्षाही घेतली. यात विद्यार्थ्यांनी अचुक उत्तरे देत मालाचे बरोबर पैसे घेतल्याचे पाहायला मिळाले.


किराणा दुकान व प्लास्टिक खेळणी दुकानातुन महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात खरेदी केली. या मेळाव्यात सात हजार रूपयाची खरेदी विक्री झाल्याचे शाळेचे मुख्याध्यापक विकास घोडके यांनी सांगितले. बालआनंद मेळाव्यातून प्रत्यक्ष खरेदी विक्री, नफा तोटा, विविध पदार्थाची ओळख, बनविण्याची क्रिया, विविध आकार, व्यवहारीक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले आहे असे सहशिक्षिका यु. व्ही. बर्डे यांनी सांगितले. सदरील मेळावा चांगल्या प्रकारे नियोजन केल्याने अतिशय सुंदर झाला. चवदार पदार्थाची मेजवानी मिळाली अशी प्रतिक्रिया केंद्रप्रमुख विश्वजित चंदनशिवे, जिवन गायकवाड यांनी दिली. यावेळी शिवराज पाटील, लक्ष्मण भोंडवे, शहाजी दळवे, शिवहारी दळवे, विनायक गरगडे, बालाजी बाबळे, मारूती भोंडवे, बालाजी सोनटक्के, मुस्तफा मुजावर, राजेश भोंडवे, सतीश मत्ते, बब्रुवान भोंडवे, बब्रुवान मत्ते, आनंदा हिरवे, विश्वनाथ मत्ते, विश्वनाथ पाटील, महादेव पाटील, प्रभाकर भोंडवे, दादा पवार, हणमंत भोंडवे, कृष्णाथ भोंडवे, शरद भोंडवे, वंदना गरगडे, सुरेखा भोंडवे, सविता दळवे, सुनिता मत्ते, सुनिता गोरे, वैशाली गरगडे, बालीका भोंडवे, संजिवनी भोंडवे, रेखा दळवे, जनाबाई बोंडगे, समिना मुजावर, संजिवनी भोंडवे, काशिबाई भोंडवे, कालींदा मत्ते यांच्यासह महिला, युवक वर्ग, पालक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक विकास घोडके, उषा बर्डे, हमीद मुजावर, रईसा मुजावर, पालक व विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.

Tags: बाल आनंद मेळावालोहारा
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर

Next Post

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Related Posts

तंबाखूमुक्त युवा अभियान अंतर्गत सास्तुर येथे जनजागृती कार्यक्रम
Blog

तंबाखूमुक्त युवा अभियान अंतर्गत सास्तुर येथे जनजागृती कार्यक्रम

14/10/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
शरण पाटील फाउंडेशन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतरस्त्याचे भूमिपूजन
Blog

शरण पाटील फाउंडेशन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतरस्त्याचे भूमिपूजन

27/08/2025
लोहारा तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक संपन्न
Blog

लोहारा तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक संपन्न

07/08/2025
लोहारा पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी यांचा निरोप समारंभ
Blog

लोहारा पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी यांचा निरोप समारंभ

24/07/2025
आषाढी एकादशीनिमित्त तावशीगड ते माकणी पर्यंत विद्यार्थ्यांची बाल दिंडी
Blog

आषाढी एकादशीनिमित्त तावशीगड ते माकणी पर्यंत विद्यार्थ्यांची बाल दिंडी

06/07/2025
Next Post
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's