दि. 01.04.2024 रोजी धाराशिव (dharashiv) मधील बेंबळी रोड लगत सिध्देश्वर बेकरीच्या पुढे काही अंतरावर अनोळखी इसमांनी साळुंके नगर येथील पत्रकार (journalist) रविंद्र शिवाजी केसकर यांच्यावर अज्ञात कारणावरुन नमुद आरेापींनी त्यांची मोटरसायकल आडवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डाव्या गालावर कोयत्याने वार करुन जखमी करुन पळून गेले होते.
त्यावरुन पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे गुरनं 139/2024 कलम 307, 341, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. प्रमाणे दि. 02.04.2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या गांर्भीय लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक (sp) श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनपर सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सपोनि श्री. अमोल मोरे, सपोनि श्री. सचिन खटके, सपोनि कल्याण नेहरकर (पोलीस ठाणे शिराढोण), स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/ विनोद जानरव, पोहेकॉ/अमोल निंबाळकर, पोहेकॉ/समाधान वाघमारे, पोहेकॉ/ हुसेन सय्यद, जावेद काझी, पोना/ बबन जाधवर, पोना/नितीन जाधवर, पोकॉ/रविंद्र अरसेवाड, पोकॉ/ योगेश कोळी, चालक पोहेकॉ/ महेबुब अरब, विजय घुगे, पोकॉ/ सुनिल मोरे( TAW) यांचे पथकाने तांत्रीक विशलेषणावरुन व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी नामे- दत्तात्रय भरत नरसिंगे रा. तांदुळजा ता. जि. लातुर, यास गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल सह तांदुळजा येथुन ताब्यात घेवून त्याच्या कडे गुन्ह्याच्या संदर्भात कौशल्य पुर्ण रितीने सखोल चौकशी केली असता त्यांने सदरचा गुन्हा इतर दोन साथीदार व गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार प्रेमकुमार सुखदेव बनसोडे, रा. शाहुनगर धाराशिव याच्या नियेजनानुसार केला असल्याचे सांगितल्याने प्रेमकुमार सुखदेव बनसोडे याचा शिराढोण पोलीस (police) ठाणे यांच्या मदतीने शोध घेवून त्यास शिराढोण पोलीस ठाणे हद्दीतीन जायफळ या गावातुन ताब्यातुन घेवून त्याच्या गुन्ह्या संदर्भात सखोल तपास केला असता त्यांने सदर गुन्हा हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे, श्री सचिन खटके, विनोद जानरव, पोहेकॉ/अमोल निंबाळकर, पोहेकॉ/समाधान वाघमारे, पोहेकॉ/ हुसेन सय्यद, जावेद काझी, पोना/ बबन जाधवर, पोना/नितीन जाधवर, पोकॉ/रविंद्र अरसेवाड, पोकॉ/ योगेश कोळी, चालक पोहेकॉ/ महेबुब अरब, विजय घुगे, पोकॉ/ सुनिल मोरे, अशोक कदम ( TAW)यांच्या पथकाने केली आहे.