लोहारा शहरातील श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी निमित्त रविवारी (दि.६) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोहारा शहरासह परिसरातील श्रीराम भक्तांनी जास्तीत जास्त उपस्थित राहन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम नवमी उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोहळ्यानिमित्त दि. ६ एप्रिल रोजी श्रीराम मंदिरात सकाळी पूजन, प्रसाद, पालखी मिरवणूक, जगदंबा मंदिरात महाप्रसाद वाटप तसेच सायंकाळी मिरवणूक होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. श्रीराम भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.