वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्य परिवहन महामंडळाच्या कळंब आगारात वाहक पदावर कार्यरत असणाऱ्या मंगल गिरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर विविध स्तरातून होत असलेल्या टिकेनंतर अखेर हे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
कळंब आगारातील महिला वाहक मंगल गिरी या सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोवर आहेत. मात्र त्यांचे हे वर्तन महामंडळासाठी बदनामीकारक ठरत असल्याचा ठपका ठेवत काही दिवसांपूर्वी त्यांचे निलंबन करण्यात आले होते. निलंबन झाल्यानंतर विविध स्तरातून जोरदार टीका होऊ लागली. तसेच मंगल गिरी यांना पुन्हा सेवेमध्ये घेण्याची मागणी होऊ लागली. अखेर महामंडळाने त्यांचे हे निलंबन मागे घेतले असून यापुढे त्या पुन्हा सेवेत दिसणार आहेत.