एका गावातील एक 6 वर्षीय मुलगी – अल्पवयीन मुलीवर (नाव- गाव गोपनीय) दि.30.08.2022 रोजी सदर मुलगी ही रस्त्यात एकटी खेळत असताना गावातील एका तरुणाने सदर मुलीगी ही एकटी असल्याचा फायदा घेवून तिस एका शेतात घेउन जाउन तीच्यावर लैंगीक अत्याचार ( बलात्कार) केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीचे वडीलांनी दि.30.08.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 376, 376 (अ) (ब) सह पोस्को कलम 4, 6, 8, 12, 14 तसेच It act- 66 (ई) अंतर्गत गुन्हा 302/2022 नोंदवला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सई भोरे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर यांनी करुन गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालय, उस्मानाबाद येथे 60 दिवसाचे आत दाखल केले होते. या स्पेशल केस नं. 89/2022 ची सुनावनी मा. श्रीमती अंजू शेंडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उस्मानाबाद यांच्या न्यायालयाने आज दि. 08.06.2023 रोजी निकाल जाहीर केला. यात अंकुश पोपट वडणे, 32 वर्षे, यांना भा.दं.सं. कलम- च्या उल्लंघनाबद्दल आजन्म कारावासासह 500 ₹ दंड व भा.दं.सं. 363, प्रमाणे 7 वर्षे कारावास व 1 हजार दंड न भरल्यास 15 दिवस साधा कारावास , 376 (अ) (ब) आणि 5 ( m), कलम 6 पोक्सो मध्ये अजन्म कारावास आणि 25 हजार दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावास, भा.द.स. 376 (ई) व 5( t), 6 पोस्को ॲक्ट मध्ये अजन्म कारावास आणि 20 हजार दंड, दंड न भरल्यास 2 महिने साधा कारावास, 5( I), 6 पोस्को ॲक्ट मध्ये अजन्म कारावास आणि 25 हजार दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावास, 14 पोक्सो ॲक्ट मध्ये 5 वर्षे कारावास आणि हजार दंड, दंड न भरल्यास 15 दिवस साधा कारावास, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम – 66 (ई), नुसार 3 वर्षे कारावास आणि 10 हजार दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास, शिक्षा सुनावली आहे. तसेच अंकुश पोपट वडणे, 32 वर्षे, रा. माळुब्रां, ता. तुळजापूर याचेवर पोलीस स्टेशन तामलवाडी, जि. उस्मानाबाद, पोलीस ठाणे फौजदार चावडी जि. सोलापूर, पोलीस ठाणे खडक पुणे, पोलीस ठाणे स्वारगेट पुणे येथे महिला संबंधाने नमुद आरोपीने नाव बदलून गुन्हे केल्याने दाखल आहे. त्यात फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे 6 वर्षे शिक्षा झालेली आहे. तसेच खडक पोलीस ठाणे पुणे येथे गुन्ह्यात 10 वर्षे शिक्षा झालेली आहे. नमुद आरोपी हा बालवया पासून असे गुन्हे करत आलेला आहे. तेव्हा पासून तो जेल मध्ये होता. सदरचा गुन्हा घडन्यापुर्वी नमुद आरोपी हा पंधरा दिवसा पुर्वीच जेल बाहेर आला होता.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन डॉ. सई भोरे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर, उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर पोउपनि- श्री. सुकुमार उर्फ राकेश बनसोडे, पोलीस अंमलदार- गवळी, यांच्या पथकाने केली आहे. प्रभारी, अधिकारी कनव्हीक्शन सेल उस्मानाबाद सपोनि- श्री. सुनिल कुमार काकडे, पोलीस हावलदार सुधाकर सगर, कोर्ट पैरवी-महिला पोलीस हवालदार वनिता वाघमारे, मा. न्यायालयात दोषारोप दाखल झाल्या पासून आज रोजी पर्यंत कामकाज पाहिले आहे.विशेष सरकारी वकील- निलेश जोशी यांनी सदर केसची सरकारी पक्षा तर्फे कामकाज पाहिले.