वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी बुधवारी दि. 21.12.2022 रोजी जिल्हाभरात 08 छापे टाकले. यात छाप्यादरम्यान घटनास्थळावर आढळलेले जुगार चालवण्याच्या साहित्य, दोन मोबाईल फोनसह रोख रक्कम असा एकुण 38,130 ₹ चा माल पोलीसांनी जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे खालीलप्रमाणे 08 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमरगा शहरात 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी उमरगा येथील- शशीकांत तेलंग व दिलीप बिराजदार हे दोघे उमरगा बस स्थानक परिसरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी एकुण कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य, एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा 9,330 ₹ चा माल बाळगलेले आढळले.
2) भुम एसडीपीओ च्या पथकाने भुम शहरात 2 ठिकाणी छापे टाकले. यात भुम येथील- गणेश अंधारे व अजय शेंडगे आणि यासीन शिकलकर व रहीम सौंदागर हे चौघे भुम येथील ओंकार चौकात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकुण कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य, एक मोबाईल फोन व रोख रक्कम 20,740 ₹ चा माल बाळगलेले आढळले.
3) उमरगा पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. यात उमरगा येथील- शिवाजी देशमुख, बसवकल्याण येथील- महंमद खान हे दोघे उमरगा बस स्थानकाजवळ दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकुण कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 6,100 ₹ रक्कम बाळगलेले, तर बलसूर तांडा येथील- संजय जाधव हे गावातील एका दुकानासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,360 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.
4) वाशी पो.ठा. च्या पथकाने पारा गावात छापा टाकला. यावेळी ग्रामस्थ- रमेश मोळवणे हे गावातील मुख्य चौकातील पाण्याच्या टाकीखाली कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 600 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.