वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा ते दाळिंब (कल्लेश्वर मंदीराजवळील) रस्त्याच्या ओढ्यावरील दोन पुलाच्या, आणि डांबरी रस्ता कामाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे, माजी पं. स. सदस्य बाळासाहेब स्वामी तसेच उपस्थित प्रमुख पदाधिकारी, शेतकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कलदेव निंबाळा – शास्त्री नगर दाळिंब या रस्त्याच्या शिवारातील पूल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी, महिला व मधल्या मार्गे शास्त्री नगर, दाळिंबाला जाणारे प्रवासीही विविध लोकप्रतिनिधींना करीत होते. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. कलदेव निंबाळच्या शेतकरयासाठी ही अत्यंत महत्वपूर्ण आणि अत्यावश्यक मागणी होती. दर वर्षी या शिवारातील महिला शेतकरी नागरिक, जनावरे व मधल्या मार्गे दाळिंबाला जाणारे प्रवासी यांना पाणी व चिखलातून जावे लागत होते. काही काळ रस्ता बंद होवून सालेगाव मार्गे 5-6 किलो मीटर दूरवरून शेतात यावे लागत होते. अनेक वर्षांपासून शेतकरी ही मागणी करत होते. या कामासाठी ग्रामपंचायत व गावच्या वतीने सरपंच तथा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे यांनी गावच्या वतीने ही मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्याकडे केली होती. दाजीनी शेतकर्यांच्या अत्यंत महत्वाच्या या मागणीला प्राधान्य देत कामासाठी योग्य निधी दिला आणि मोठी समस्या दूर केली.
डांबरी रस्ता व पुलामुळे आमचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न दाजी मुळेच मार्गी लागला असून पूल, रस्ता यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. याबद्दल व गावाला सतत निधी देत असल्याबद्दल सरपंच सुनिता पावशेरे यांनी दाजींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी माजी पं. स. सदस्य बाळासाहेब स्वामी, सुजीत पाटील, बंडू पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत दाजींचे आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी अमोल पाटील, अमर नांगरे, संभाजी बिराजदार, चेअरमन तुकाराम बिराजदार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालाजी पाटील, पोलीस पाटील पांडुरंग पाटील, माजी सरपंच बाबूराव पावशेरे, देविदास पावशेरे, कलाकार पाटील, कल्लेश्वर जाधव, अशोक सुर्यवंशी, दिगंबर पावशेरे, ग्रा. पं. सदस्य योगेश दळवे, रमेश पाटील, प्रभाकर बिराजदार, मल्लिनाथ कारभारी, दिलीप बिराजदार, श्रीनिवास पाटील, उत्तम सरवदे, प्रा. रमाकांत पाटील, विठ्ठल बलसुरे, शिवाजी रसाळ,,पांडूरंग पावशेरे, रतन सुर्यवंशी, सुधाकर कुलकर्णी, दत्तात्रय पावशेरे, विठ्ठल बलसुरे, मल्लिनाथ कारभारी, निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, शिवाजी, पाटील, बंडू पाटील, अशोक सुर्यवंशी, आदित्य पावशेरे, प्रकाश पावशेरे, मारुती साळुंके,पांडूरंग गुगळगावे, शिवाजी बोकडे, अप्पाराव यलोरे , कल्लेश्वर, जाधव,चंद्रकांत पाटील, सुजीत पाटील, समीर कांबळे, भागवत लड्डा, विठ्ठल बिराजदार, गजानन पाटील, सुनील बलसुरे, नितीन पाटील,महेबूब मुल्ला, माणिक पाटील, नरसिंह जोशी, महादेव घंटे, चंद्रकांत बलसुरे, गूरलिंग कारभारी, पंढरीनाथ कल्याणकर,रमाकांत पावशेरे, प्रभाकर सुर्यवंशी, नागनाथ चिंचोले, गहिनीनाथ बिराजदार,संदीप पाटील, मुलचंद लड्डा, विठ्ठल दासमे बालाजी गुरव यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते देविदास पावशेरे यांनी मानले.
बातमी दिल्या बद्धल आभारी आहे. 🌹🙏🌹