Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

गोगलगायींचे सामूहिक व एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे अत्यावश्यक – तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांचे शेतकऱ्यांना आवाहन

admin by admin
21/07/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील शेतकरी यावर्षी वेगळ्याच प्रकारच्या नवीन संकटाला तोंड देत आहेत. गोगलगायांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी बुधवारी (दि.२०) तालुक्यातील सास्तुर व होळी शिवारातील गोगलगायीने प्रादुर्भाव केलेल्या क्षेत्राची पाहणी केली.
यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी बिडबाग म्हणाले की, गोगलगाय ही यापूर्वी उपद्रवी कीड म्हणून गणली जात नव्हती. परंतु यावर्षी काही ठिकाणी गोगलगाईंचा प्रादुर्भाव हा सोयाबीन पिकावर दिसून येत आहे. तरी या संदर्भात गावातील तसेच शिवारातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने विविध पद्धतींचा वापर करून गोगलगायींवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः पुरता विचार न करता सामूहिक पद्धतीने यावर नियंत्रण मिळवावे असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी यांनी गोगलगायीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती सांगितली. ते म्हणाले की, शेताचे बांध स्वच्छ ठेवावे. त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे. जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील. शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी. फळबागेमध्ये झाडाच्या खोडास १० टक्के बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड (स्नेलकिल ) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा. सोयाबीन यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.


जर पपईची पाने आणि झेंडूची रोपे हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्‍झाम ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे. सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे. वरील गोगलगायनाशक अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा. अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या व एकात्मिक पद्धत वापरून वरील प्रमाणे उपाय योजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण लवकरात लवकर व अधिक प्रभावीपणे होईल असे प्रतिपादन बिडबाग यांनी केले.

यावेळी कृषी सहाय्यक दीपक जाधव यांनी शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यास बीजप्रक्रिया करून रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी असे आवाहन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी शिवाजी ताराळकर, कृषी पर्यवेक्षक गयाप्रसाद सागर, प्रदीप भोसले, कृषी सहाय्यक दीपक जाधव, बाळासाहेब बिराजदार, पी. पी. पवार यांच्यासह शेतकरी प्रकाश औसेकर, विरेंद्र पवार, विकास पांचाळ, गोविंद सुतार, उपसरपंच राजवर्धन पाटील, दौलत पुरणे, रोहित पुरणे, सचिन मिटकरी, हरी माळी, शिवराज सडडू , श्रीधर माने, विजयकुमार मिटकरी व गावातील ईतर शेतकरी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उपाययोजनाकृषी विभागगोगलगाय
Previous Post

उमेदच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण- राजीव गांजरे सास्तूर प्रभागातील महिला स्वयंसहायता गटांना कर्ज वाटप

Next Post

माकणी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बालाजी साठे, व्हाईस चेअरमनपदी शरद जाधव यांची बिनविरोध निवड

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

माकणी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बालाजी साठे, व्हाईस चेअरमनपदी शरद जाधव यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's